शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

विकासाच्या राजकारणात सिंदेवाही तालुक्याची कुचंबना

By admin | Updated: September 8, 2016 00:46 IST

चंद्रपूर- नागपूर व चिमूर- गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले सिंदेवाही नगर हे चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यवर्ती केंद्र आहे.

विकास खुंटला: पालकमंत्र्यांकडून अपेक्षाबाबुराव परसावार सिंदेवाहीचंद्रपूर- नागपूर व चिमूर- गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले सिंदेवाही नगर हे चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यवर्ती केंद्र आहे. धानाचे आगार म्हणून या तालुक्याची ओळख आहे. तसेच हा तालुका वनवैभवानी समृद्ध आहे. महाराष्ट्र शासनाने १९८२ मध्ये सिंदेवाही तालुक्याची निर्मिती केली. आजघडीला ३४ वर्षाचा काळ लोटला असला तरी तालुकावासीयांचा वनवास मात्र संपलेला नाही.तालुक्याची लोकसंख्या एक लाख २५ हजार असून या तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती आहेत. तालुका वाढला. लोकसंख्या वाढली. तशा समस्याही वाढल्या. मात्र त्या समस्या सोडविण्याची राजकीय इच्छाशक्ती त्या मानाने वाढली नाही. हे वास्तव तालुक्यातील अनेक गावात दिसून येत आहे. नगर पंचायत निर्मितीकरिता सिंदेवाहीकरांना आंदोलन करावे लागले. त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा लागला. तेव्हा कुठे महाराष्ट्र शासनाने सिंदेवाही नगर पंचायत घोषित केली. सिंदेवाही तालुक्यातील अनेक ग्रामखेडे विकासापासून दूर असून रस्ते, वीज, पाणी निवारा, आरोग्य सेवा, सिंचन व्यवस्थेअभावी तालुक्याच्या नशिबी समस्या कायम आहेत. विकासाच्या दृष्टीकोनातून या तालुक्याला चंद्रपूर जिल्ह्यात सावत्रप्रमाणे वागणूक मिळत असल्याने ‘विकास’ या शब्दाचा नेमका अर्थ काय हेदेखील येथील नारिकांना आजवर कळलेला नाही. मागील दहा वर्षाचा राजकीय आढावा घेतल्यास सन २००४ ते २०१४ पर्यंत ब्रह्मपुरी निर्वाचन क्षेत्रात १० वर्ष भाजपाचे आमदार प्रा. अतुल देशकर होते. तर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यानंतर २०१४ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार विजयी झाले. तर महाराष्ट्रात भाजपा- शिवसेना युतीची सत्ता आहे. राज्यात भाजपा- शिवसेना सत्ता स्थापन होताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्र राज्याचे वन व अर्थ मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. हे महाराष्ट्र व चंद्रपूर जिल्ह्याकरिता भूषणावह आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरु आहेत तर सिंदेवाही नगर पंचायतीला विकास कामे करण्याकरिता निधी उपलब्ध झाला नाही, हे सिंदेवाही नगराचे दुदैव आहे. सिंदेवाही नगर राष्ट्रीय महामार्गावर असूनही चौपदरीकरण रस्ता मंजूर झाला नाही. सिंदेवाही नगर पंचायतीला निधी न मिळाल्यामुळे येथील स्मशानभूमी व समाज मंदिराची दुर्दशा, गावातील अंतर्गत खड्डेमय रस्त्याची दुर्दशा, सन १९७४ ची जीर्ण नळ योजना, औद्योगिक वसाहत व क्रीडा संकुल धूळ खात पडले आहे. सिंदेवाही तालुक्यात वन उद्यानाला मंजुरी नाही तर निसर्गरम्य व वन्यप्राण्याचा वावर असलेल्या सिंधबोडी स्थळाला पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला नाही. हुमन व गोसीखुर्द सिंचन प्रकल्प रेंगाळलेले आहेत. तालुक्यात उद्योग नसल्याने बेरोजगाराची समस्या वाढून जटील झाली आहे. ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. येथील कृषी संशोधन केंद्रात कृषी तज्ज्ञांची नियुक्ती नाही, त्यामुळे संशोधन थांबले आहे. एस. टी. आगार नाही, अशा विविध समस्यामुळे ग्रामसखेड्याचा व सिंदेवाही नगराचा विकास खुंटला असून तालुक्याची विकास गती मंदावली आहे. झाडीपट्टीतील नवरगावाची उपेक्षासिंदेवाही तालुक्यातील झाडीपट्टीतील रंगभूमी म्हणून ओळखले जाणारे तसेच भारतीय शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा नटवर्य स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर यांचे नवरगाव ही कर्मभूमी आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून नवरगावची विदर्भात ओळख आहे. सन १९३५ मध्ये स्वातंत्र्यावीर सावरकर हे नटवर्य बालाजी पाटील बोरकर यांना भेटण्याकरिता नवरगावला आले होते. नवरगाव विदर्भाची सांस्कृतिक पंढरी आहे. सन १९७५ मध्ये बालाजी पाटील बोरकर यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नवरगावला आले होते. याचे स्मरण विदर्भातील जनतेला आहे. नाट्यकलावंत दिग्दर्शक, निर्माता व चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य सदानंद बोरकर यांनी झाडीपट्टीतील रंगभूमीची परंपरा कायम ठेवली आहे. नुकतेच नवरगावला ‘ताटवा’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. सद्यस्थितीत हे गाव विकासापासून वंचित आहे. नवरगाव हे २० हजार लोकसंख्येचे गाव आहे. नवरगावला तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनची निर्मिती व्हावी व बसस्थानक व्हावे, अशी नवरगाववासीयांची बऱ्याच वर्षापासून मागणी आहे. अशा विविध समस्या तालुक्यात निर्माण झाल्या असून जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे, एवढीच सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांची अपेक्षा आहे.