शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

कोरपना पं.स. मधील इंदिरा आवास योजनेत घोळ

By admin | Updated: July 8, 2014 23:22 IST

अतिदुर्गम व मागास समजल्या जाणाऱ्या आदिवासीबहुल कोरपना तालुक्यातील पंचायत समितीत इंदिरा आवास योजनेत घोळ झाला असून पावसाच्या तोडांवर अनेक गरीब कुटुंबे उघड्यावर राहण्याची शक्यता आहे.

लखमापूर : अतिदुर्गम व मागास समजल्या जाणाऱ्या आदिवासीबहुल कोरपना तालुक्यातील पंचायत समितीत इंदिरा आवास योजनेत घोळ झाला असून पावसाच्या तोडांवर अनेक गरीब कुटुंबे उघड्यावर राहण्याची शक्यता आहे. शासनाने या घोटाळ्याची चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी कोरपना तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी वरिष्ठांकडे केली आहे.सन २०१०-१४ मध्ये ५४ ग्रामपंचायत हद्दीतील १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०१४ पर्यंत अनु. जाती जमाती ई.मा. वर्ग अल्प संख्यांक समुदाय लाभार्थी साठी घरकुल योजना राबविण्यात आल्या. मात्र पंचायत समितीमध्ये समन्वय व नियंत्रणाअभावी अनेक कामे अर्धवट झालेली आहे. यामुळे लाभार्थी लाभ घेण्यात असमर्थ ठरलेला आहे. गैरव्यवहार होत असल्याने व पिळवणूकीमुळे लाभार्थी त्रस्त आहे. बांधकाम झाले नसताणा तथा ग्रामसेवकाचेप्रमाणपत्र न घेता देयक देण्याचा पराक्रम पंचायत समितीमध्ये होतअसल्याचे लाभार्थी त्रस्त आहेत. तसेच योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे. याकरिता या संपूर्ण बाबीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सन २०१० ते २०१४ कालावधीतील मजूर लाभार्थीच्या गावनिहाय बांधकामाची तपासणी करुन प्रगती व बांधकाम सध्यस्थितीचा अहवाल घेण्यात यावा. लाभार्थीच्या शौचालय बांधकाम पूर्ण होवून वापर केल्या जात आहेत किंवा शौचालय बांधकाम अपूर्ण असताना तिसरा हप्ता देण्यात आला. ज्या व्यक्तीच्या नावाने घर मंजूर आहे. तो व्यक्ती घराचा वापर करीत आहे किंवा नाही हे तपासण्यात यावे.काही ठिकाणी जुनेच बांधकाम असलेल्या घराची पाहणी करुन बांधकाम न करता बिल देण्यात आले. लाभार्थीना ज्या वित्तीय वर्षात घर मंजूर झाले, त्याच्या दोन वर्षापूर्वीचे ग्रामपंचाययत नमूना आठ तपासण्यात यावे जी व्यक्ती स्लॅब पक्के घर अशी नोंद असताना सुद्धा कोडशी (बु.) येथील एका लाभार्थीच्या बांधकामाची देयके देण्यात आलीत. असाच प्रकार अनेक ठिकाणी घडला आहे. ग्रामसभेतील मंजूर यादीतील नावाच्या नोंदी रद्द करुन बीपीएलमधून वगळलेल्या लाभार्थीचे घर बांधकाम रद्द केले असता, कोणतीही प्रशासकीय मंजुरी नसताना सन २०१३-२०१४ मध्ये रद्द केलेल्या लाभार्थीनां घर बांधकाम निधी देण्यात येत आहे. ही बाब गंभीर असून हा प्रकार कोरपना तालुक्यात घडत आहे. यामुळे ग्रामसभेची हरकत व वरिष्ठ कार्यालयानी रद्द केलेल्या लाभार्थीला मंजुरी नसताना देयक का देण्यात आले. ही बाब तपासण्यात यावी सन २०११-१२ मध्ये लाभार्र्थींना २५ हजार रुपये अ‍ॅडवान्स देण्यात आले. यापैकी बरेच लाभार्थीनी बांधकाम पूर्ण केलेले नाही. काही लाभार्थीचे घर जोता लेव्हल असताना त्यांना संपूर्ण बांधकामाची देयके देण्यात आली नाही. काही लाभार्थी पूर्वीच लाभ घेवून इंदिरा आवास योजनेत असताना पुन्हा त्याच लाभार्थीला लाभ देण्यात आलेला आहे. घरकुल ज्या वर्षात मंजूर झाले त्या वर्षी अंदाज पत्रकीयय तरतुदी नुसार कामे त्यातकिमतीत व्हावी असे असताना काही लाभार्थीना तुम्ही चिरीमिरी द्या तुम्हालाप्रती घर ९० हजार योजनेत समावेश करुन देतो. म्हणून पं.स. मध्ये गैर व्यवहार केल्या जात आहे.घरकुल योजनेच्या लाभार्थी संबंधात गाव निहाय गेल्या चार वर्षाचा आढावा घेतल्यास घरकुल योजनेच्याबट्याबोळ उघड होवून गरजू लाभार्र्थींना न्याय मिळण्याकरिता उपरोक्त तक्रारीची चौकशी करण्याची मागणी सैय्यद आबीद अली यांनी केली आहे. (वार्ताहर)