शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

सरकारी गुरुजींपेक्षा अल्पवेतन घेणाऱ्या कॉन्व्हेंटचे शिक्षक सरस

By admin | Updated: July 24, 2016 01:11 IST

शिक्षण हे वाघिनीचे दूध असून ते प्राशन केल्याने गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले जाते.

जिल्ह्याची स्थिती : शिक्षण क्षेत्रातील वास्तव चिंधीचक : शिक्षण हे वाघिनीचे दूध असून ते प्राशन केल्याने गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले जाते. शिक्षण सर्वांगिण विकासाचे साधन आहे. शिक्षणामुळे मनुष्याच्या जीवनाला दिशा प्राप्त होतो. परंतु सरकारी शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. अल्प पगारात काम करणारे कॉन्व्हेंटचे शिक्षक चांगले शिक्षण देत आहेत. शिक्षणाच्या साहाय्याने मनुष्याच्या हातून कल्याणकारी कामे होऊ शकतात आणि त्याच कारणामुळे जगातील अनेक देश संरक्षण क्षेत्रानंतर शिक्षण क्षेत्रावर अर्थसंकल्पातील मधील अधिकची निधीची तरतूद करीत असतात. शासन ग्रामीण भागातील व दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, विद्यार्थी चांगला घडावा म्हणून शासन शिक्षकांच्या वेतनावर लाखो रुपये खर्च करीत आहे. जिल्हा परिषद, अनुदानीत शाळा, महानगरपालिका, नगरपालिका शाळेत सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याची जाणीव सरकारी शिक्षकांना नाही. स्पर्धेच्या युगात मुलांचा टिकाव लागावा, त्यांच्यामध्ये गुणवत्ता टिकून राहावी, या कारणासाठी हा खर्च केल्या जातो. ४० हजार रुपये वेतन घेणाऱ्य सरकारी गुरुजीकडून शिकलेला शिष्य घडलेला दिसत नाही. त्यांच्याकडे अद्यायावत ज्ञानाचा अभाव दिसतो. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा टिकाव लागताना दिसत नाही. त्यामानाने अल्पवेतन होणाऱ्या कान्व्हेंटच्या शिक्षकांकडून शिकेलला विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. त्यांचा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये टिकाव लागत आहे. महिनोकाठी गलेलठ्ठ पगार घेणारे सरकारी गुरुजी शिक्षण देण्यात उदासिन का, हा एक मोठा संशोधनाचा विषय ठरू शकतो. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील लोकांनीसुद्धा सरकारी शाळेकडे पाठ फिरवून कान्व्हेंटच्या वाटेवरून जात आहेत. त्यामुळे या शाळांना सुगीचे दिवस येत आहेत. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणण्यासाठी या गुरुजीचा किती सिंहाचा वाटा आहे, हे दिसून येत आहे. (वार्ताहर)