शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

मागास महिलांचे सक्षम पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:11 IST

नवरात्र हा आदिशक्ती, मातृशक्तीचा उत्सव आहे. मातृशक्ती सुदृढ व सशक्त करायची असेल तर महिलांचे सक्षमीकरण अत्यंत गरजेचे आहे. पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्कुटपालन प्रकल्प हा दुर्गम भागातील महिलांचे सक्षम पाऊल आहे, असे कौतुकोदगार राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : आदिवासी महिलांची पोल्ट्री प्रोड्युसर्स कंपनी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नवरात्र हा आदिशक्ती, मातृशक्तीचा उत्सव आहे. मातृशक्ती सुदृढ व सशक्त करायची असेल तर महिलांचे सक्षमीकरण अत्यंत गरजेचे आहे. पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्कुटपालन प्रकल्प हा दुर्गम भागातील महिलांचे सक्षम पाऊल आहे, असे कौतुकोदगार राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्कुटपालन संस्थेच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, साधारणत: कंपनी असे म्हटले तर टाटा, बिर्ला अशी मोठी नावे डोळयासमोर येतात. पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमी. ही कंपनी माझ्या भगिनींची कंपनी आहे. याचा मला खरोखर अभिमान आहे, असेही ते म्हणाले.या मतदार संघात रोजगार व स्वयंरोजगाराला चालना देणारे अनेक प्रकल्प आपण राबवित आहोत. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची दखल सिंगापूरच्या प्रसार माध्यमांनी घेतली आहे. मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय आपण या भागात राबविणार आहोत. १५ नोव्हेंबरपर्यंत टुथपिक तयार करण्याचा प्रकल्प आपण कार्यान्वित करणार आहोत. पोंभुर्णा येथे मॉडेल पंचायत समिती आपण उभारत आहोत. युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी साहित्य उपलब्ध करण्याच्या दृष्टीने अद्ययावत वाचनालय उभारत आहोत. पोंभुर्णा येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र निर्माण होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने मूल आणि पोंभूर्णा तालुक्यात टाटा ट्रस्टच्या सहाय्याने सधन शेतकरी प्रकल्प आपण राबवित आहोत. पोंभुर्णा येथे सुसज्ज अशी ग्रामीण रूग्णालयाची इमारत उभी होत आहे. चिचडोह सिंचन प्रकल्प आपण पूर्ण केला आहे. लवकरच हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत रूजू होणार आहे. विशेष बाब म्हणून मूल व पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना विहिरी आपण उपलब्ध करून दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, नगर पंचायत अध्यक्ष श्वेता बनकर, गजानन गोरंटीवार, अविनाश परांजपे, जि.प.सदस्य राहुल संतोषवार, न.प. उपाध्यक्ष रजिया कुरैशी, जि.प. सदस्य गौतम निमगडे, पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख, पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमी. च्या अध्यक्ष यमुना जुमनाके, कुंतीबाई धुर्वे, तहसीलदार टेमकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.२८, २९ ला युथ एम्पॉवरमेंट समीटपंतप्रधानांसमोर आपल्या प्रकल्पाचे निर्भीडपणे सादरीकरण करणाऱ्या कुंतीबाई धुर्वे यांचे कौतुक करत ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, मिशन शक्तीच्या माध्यमातून जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्टवर झेंडा फडकवला. २८ आणि २९ आॅक्टोंबरला बल्लारपूर येथे युथ एम्पॉवरमेंट समीट आपण आयोजित करीत आहोत. त्या माध्यमातून मिशन सेवा, मिशन स्वयंरोजगार, मिशन कौशल्य विकास, मिशन फॉरेन सर्विसेस, मिशन सोशल वर्क, मिशन उन्नत शेती या सहा मिशनची सुत्री आपण अमलात आणत आहोत. हा जिल्हा रोजगार व स्वयंरोजगारयुक्त व्हावा हेच आपले ध्येय असल्याचे ना.सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.