मागणी : निरूपमा डांगे यांना निवेदन भद्रावती : येथील ऐतिहासिक विजांसन बुद्धलेणी असून ही लेणी बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान आहे. या स्थळाला देश-परदेशातील बौद्ध अनुयायी, पर्यटक, भिक्खुगण, संशोधक, साहित्यिक आदी भेटी देत असतात. ही लेणी भद्रावती शहराचा ऐतिहासिक वारसा असून पर्यटनच्या दृष्टीने विकासापासून वंचित आहे. त्यामुळे विज्जासन बुद्धलेणी पर्यटनस्थळ घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली.विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिव निरूपमा डांगे यांनी या बुद्धलेणीला भेट दिली. त्यांनी लेणीची पाहणी केली. यावेळी बौद्ध अनुयायांनी डांगे यांना निवेदन सादर करून पर्यटनस्थळ घोषित करण्याची मागणी केली. यावेळी मुंबई येथील भदन्त बुद्धपाल, भदन्त विनयशील, भदन्त पंडितानंद, भदन्त बुद्धशरण, संतोष रामटेके, जयदेव खाडे, लिना जुनघरे, नंदा रामटेके, शेवंताबाई मेश्राम, पुरूषोत्तम लिपटे, बेलेकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
विजांसन बुद्धलेणी पर्यटनस्थळ घोषित करा
By admin | Updated: September 12, 2016 00:45 IST