बॉक्स
झिका व्हायरसची लक्षणे काय?
हलकासा ताप येणे, अंग दुखी
अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे
प्रचंड डोकेदुखी, डोळे लाल होणे
अशक्तपणा आणि थकवा जाणवणे
----
कशामुळे होतो?
एडिस डाव चावल्यामुळे झिका व्हायरचा प्रसार होतो. एडिस डास हा सकाळी आणि सायंकाळी चावल्याने प्रसारास मदत होते. याच डासामुळे डेंग्यू, चिकनगुणिया आजार पसरतो.
-----
उपाययोजना काय?
परिसर स्वच्छ ठेवणे, पाणीसाठा होऊ देऊ नये, डासांचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करावी, डास चावू नये म्हणून जास्तीत जास्त अंग झाकले जातील असे कपडे घालणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.
------
आपल्याकडे झिका व्हायरसचा एकही रुग्ण नाही. परंतु, सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पूर्वतयारी म्हणून गरोदर मातांची तपासणी करणार आहोत. जर एखाद्याला ताप आल्यास त्यांनी अंगावर न काढता, तत्काळ आरोग्य केंद्र गाठून उपचार घ्यावा.
-राज गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर