शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ह्युएन-त्संंगचा ध्येयासाठीचा त्याग अनुकरणीय

By admin | Updated: September 29, 2014 00:43 IST

ध्येयासाठी सुखाचा त्याग करणाऱ्या ह्युएन- त्संगकडून संघीय प्रेरणा अनुकरणीय असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. येथील प्रियदर्शिनी सभागृहात शिव महोत्सव

ंआ.ह. साळुंखे यांचे मनोगत : शिव महोत्सव समितीची व्याख्यानमालाचंद्रपूर : ध्येयासाठी सुखाचा त्याग करणाऱ्या ह्युएन- त्संगकडून संघीय प्रेरणा अनुकरणीय असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. येथील प्रियदर्शिनी सभागृहात शिव महोत्सव समितीच्यावतीने शनिवारी आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ते म्हणाले, सहाव्या शतकातील चीन भूमीमध्ये जन्मलेल्या ह्युएन-त्संग यांच्यावर भारतातून चिनमध्ये गेलेल्या बौद्ध भिक्कूंच्या प्रभावाने प्रेरीत होऊन त्संग यांनी बुद्ध भूमीला भेट देण्याचा निर्धार केला. त्याकाळी देश ओलांडणे हे फार धोकादायक व त्रासाचे होते. यापेक्षाही राजाची परवानगी मिळणे अशक्य होते. या सर्व अडचणींवर मात करायची आणि बुद्धभूमी पाहायची, अभ्यासाची, तेथील प्रेरणा घ्यायची, या ध्येयाने पछाडलेल्या त्संग यांनी आशिया खंडातील सर्वांत मोठे वाळवंट ‘कोबी’ हे घोड्याच्या साह्याने पार केले. या प्रवासात त्यांना चार दिवस व पाच रात्री पाण्याविना रहावे लागले. भारतात परत आल्यानंतर त्यांनी एक वर्ष नालंदा विद्यापीठात घालविले. आयुष्यातील बराचसा कालावधी भारतात घालविल्यानंतर त्यांनी भारतातून ६००च्यावर ग्रंथ चीनमध्ये नेले आणि त्याचे चिनी भाषेत भाषांतर केले. त्यासाठी तेथे संघीय पद्धतीने काम केले. ते आपल्यासाठी अनुकरणीय असल्याचे डॉ. आ.ह. साळुंखे यांनी म्हणाले. हे दुसरे पुष्प स्मृतिशेष हेमंतराव माधवराव खळतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्राचार्य डॉ. सुलभा हेमंतराव खळतकर यांच्यातर्फे आयोजित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक ना.गो. थुटे तर प्रमुख अतिथी म्हणून बळीराज धोटे, प्रदीप अडकिने, हरीश सहारे, प्रा. सुलभा गावंडे, प्रदीप जानवे, श्याम जेठवाणी आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन रजनी जेऊरकर यांनी तर प्रा. डॉ. योगेश्वर दुधपचारे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. चेतन खुटेमाटे, विनोद थेरे, विवेक बलकी, प्रा. दिलीप चौधरी, डॉ. सचिन भेदे, इंजि. जीवन नारनवरे, प्रा. इरफान शेख, दिनकर श्रीरामे, अ‍ॅड. संदीप नागपुरे, डॉ. विनोद माहुरकर, डॉ. संजय घाटे आदींनी अथक परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)