शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

२६० किमीचे रस्ते झाले ‘पॉश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:11 IST

मूल, पोंभूर्णा तालुक्याचा विकास करण्याचा ध्यास जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. त्यांचे प्रयत्न आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहकार्य यामुळे इतर जिल्हा मार्गामधील २६० किमीचे रस्ते प्रमुख जिल्हा मार्गामध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : नागरिकांना मोठा दिलासा

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मूल, पोंभूर्णा तालुक्याचा विकास करण्याचा ध्यास जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. त्यांचे प्रयत्न आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहकार्य यामुळे इतर जिल्हा मार्गामधील २६० किमीचे रस्ते प्रमुख जिल्हा मार्गामध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या इतर जिल्हा मार्गाचा विकास करण्यासाठी शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणावर निधीची उपलब्धता होत नाही. यामुळे २६० किमीचे रस्ते प्रमुख जिल्हा मार्गात रूपांतरित करण्यात आले असून हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या मार्गावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. यामुळे मूल उपविभागातील सुमारे २६० किमी रस्त्याच्या रूंदीकरणासोबतच सौंदर्यीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. इजिमा रस्त्याचे रूपांतर प्रजिमामध्ये करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदाच केला असावा.राज्याचा विकास करण्यासाठी कितीही योजना शासनाने अंमलात आणल्या तरी त्याची अंमलबजावणी करणे त्या-त्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर अवलंबून असते. बºयाच ठिकाणी जनप्रतिनिधी जागरूक असतात तर अधिकारी उदासिन असतात. अशास्थितीत विकास करायचा कसा, असा प्रश्न निर्माण होतो.परंतु बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल तालुका हा याला अपवाद ठरला आहे, राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. या कामाला मूर्तरूप देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता नरेंद्र बुरांडे यांचे सहकार्य लाभत असल्याने मूल तालुका विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. सर्वप्रथम पेठगाव-मूल-भेजगाव- बेंबाळ मार्ग प्रमुख जिल्हा मार्गात रूपांतरित करण्यात आला असून यासाठी अर्थसंकल्पात ४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर भेजगावजवळ आठ कोटी रुपये खर्च करून नवीन पुलाचे बांधकाम केवळ सहा महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. इजिमा अंतर्गत येणाºया रस्त्यांची निधीअभावी दुरूस्ती रखडली होती.यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता नरेंद्र बुरांडे यांच्या प्रयत्नातून मूल, पोंभुर्णा तालुक्यातील अनेक रस्ते प्रजिमामध्ये रूपांतरित केले आहे,. यामध्ये मार्ग क्रमांक ४९, ५४, २५, ५१ व ५५ या मार्गांचा समावेश आहे. हा रस्ता २२५ किमीचा आहे. या कामासाठी सुमारे ७० कोटी रूपयांच्या जवळपास खर्च करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वसुले यांनीही १२५ किमी इजिमाचे रस्ते प्रजिमामध्ये रूपांतरित करण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे आता नागरिकांना प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे.मूल शहरही कात टाकतेयमागील काही वर्षांपासून बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील मूल शहराचा विकास झपाट्याने होत आहे. कधी मिळाले नव्हे ते रूप या मूल शहराला देण्याचा प्रयत्न ना. मुनगंटीवार यांच्या माध्यमातून केला जात आहे. मूल शहर जणू कात टाकल्यासारखे दिसत आहे. विशेष म्हणजे, मूल शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणाºया मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे, राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या सन्मानार्थ भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या पाठोपाठ परिसरातील विद्यार्थ्यांना वाचन, पठन, मनन, चिंतन करता यावे म्हणून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच भव्य प्रशासकीय इमारतीचेही काम युध्द पातळीवर सुरू आहे.