शेगाव : बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सोमवारी शेगाव येथील शिवाजी चौकात धडक कारवाई करून एका कारसह मोठय़ा रकमेच्या नकली नोटा जप्त केल्या. यावेळी एका इसमास ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एलसीबीचे पोलिस निरीक्षक बांगर यांना शेगावात एका पांढर्या रंगाच्या कारमधून नकली नोटांची वाहतूक केल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करीत एमएच १४ बीसी २८५१ ही महिंद्रा लोगन ही गाडी ताब्यात घेतली. सदर गाडी ही चितोडा येथील देवराव ऊर्फ देवांश भाऊराव हिवराळे यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. वृत्त लिहेपर्यंत एलसीबीचे पथक कार चालकासह पुढील चौकशीसाठी शेगावातून बुलडाण्याकडे रवाना झाले होते. दरम्यान, या घटनेतील एक आरोपी फरार झाला.
नकली नोटांसह कार जप्त
By admin | Updated: August 26, 2014 22:19 IST