शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

खामगाव नगर पालिकेतील अधिकाऱ्यांशी अरेरावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 14:00 IST

पालिकेत घडलेल्या या खळबळ जनक प्रकारानंतर बांधकाम अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंताही दीर्घ रजेवर गेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्थानिक नगर पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाºयासह कनिष्ठ अभियंत्यांशी अशोभनिय वर्तणूक आणि अरेरावी करण्यात आली. हा प्रकार सोमवारी दुपारी नगर पालिकेतील अध्यक्षांच्या दालनात घडला. पालिकेत घडलेल्या या खळबळ जनक प्रकारानंतर बांधकाम अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंताही दीर्घ रजेवर गेले आहेत.स्थानिक नगर पालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिविगाळ आणि दमदाटी करण्याच्या प्रकारात गत काही महिन्यांपासून वाढ झाली आहे. गत शनिवारी उपमुख्याधिकारी यांना अपमानित आणि दमदाटी करण्याचा प्रकार ताजा असतानाच, सोमवारी पालिकेतील नगराध्यक्षांच्या दालनात बांधकाम अभियंता निरंजन जोशी आणि कनिष्ठ अभियंता शुभम कुळकर्णी यांच्याशी सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेवकाने (चाचा) वाद घातला. या वादाला सत्ताधारी पक्षाच्या ‘कारभारी’दादांनी चांगलीच हवा दिली. त्यामुळे नगराध्यक्षांच्या दालनात तब्बल दीड तास हे ‘दादागिरी’चे नाट्य रंगले. सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व असलेल्या एका वार्डात एका कार्यकर्त्याचे अतिक्रमण आहे. हे अतिक्रमण हटवून त्याठिकाणी नाली बांधणे गरजेचे आहे. मात्र, एका नगरसेवकाने सदर अतिक्रमण न हटविता नालीचे बांधकाम करण्यासाठी तगादा लावला. यावरून उफाळून आलेल्या वादामुळे नगरसेवक चाचाजी आणि त्यांच्या समर्थकांनी अध्यक्षांच्या दालनात बांधकाम अभियंता जोशी आणि कुळकर्णी यांना घेरले. त्यांच्याशी अशोभनिय वर्तणूक केली. त्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी अधिक माहितीसाठी बांधकाम विभागाचे अभियंता निरंजन जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्यासोबत वाईट घडले. यावेळी मनस्थिती बरोबर नसल्याचे सांगत अधिक माहिती देण्याचे टाळले. पालिकेतील एका अधिकाºयांनी या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच बांधकाम विभागातील दोन्ही अभियंते रजेवर असल्याचे सांगितले.

बांधकाम अभियंता दीर्घ रजेवर!सत्ताधारी नगरसेवकाच्या अरेरावीचा प्रकार बांधकाम अभियंता जोशी यांनी मुख्याधिकाºयांच्या कानावर घातला. याप्रकरणी पोलिस तक्रार करण्याचीही बाजू मांडली. मात्र, तत्पूर्वीच उपाध्यक्ष आणि एक सभापती पुत्र प्रकरण निस्तारण्यासाठी पालिकेत पोहोचले. यावेळी अभियंता जोशी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान, सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे अभियंता जोशी मंगळवारपासून दीर्घ रजेवर गेले आहेत. त्याचवेळी कनिष्ठ अभियंता शुभम कुळकर्णी देखील आजारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे मंगळवारी दिवसभर पालिकेतील बांधकाम विभागाचे कामकाज रखडले होते.

पालिकेतील अधिकारी, कर्मचारी टार्गेट!गत काही दिवसांपासून पालिकेत सत्ताधारी आणि अधिकारी कर्मचाºयांचा वाद शिगेला पोहोचत आहे. त्याचवेळी सत्ताधारी नगरसेवकांमध्येही वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. गत १५ दिवसांच्या कालावधीत नगरसेवक आणि वरिष्ठ नेता, नगरसेवक आणि नगरसेवक समर्थकाचा वाद चर्चेत होता. त्यानंतर एका बड्या अधिकाºयांशी दमदाटी करण्यात आली. या प्रकाराची चर्चा थांबत नाही तोच, सोमवारी बांधकाम विभागातील अधिकाºयांना सत्ताधाºयांकडून ‘टार्गेट’ करण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव