बुलडाणा : विधानसभा निवडणुकीचा माहौल अगदीच रंगतदार होऊ घातला आहे. या प्रचाराच्या धामधुमीत स्थानिक समस्यांचा ओझरता उल्लेख करीत विकासाची ब्ल्यू-पिंट्र कोणीच मांडत नाही. महायुती, आघाडी यांचा घटस्फोट झाल्याने प्रचाराचे तंत्रच बिघडलेय. प्रचारात स्थानिक कृषी समस्या, उद्योग, बेरोजगारी, भारनियमन, विकास कामे आदींचा नाममात्र समावेश केला जात आहे. स्वबळाच्या या राजकारणात केवळ एकमेकांची पिसे काढण्यावर उमेदवार, नेते व राजकीय पक्षांचा भर असल्याने मतदारांचे मात्र मनोरंजन होत आहे.सर्वच मतदारसंघात विद्यमान आमदारांद्वारे मतदारसंघात झालेली विकास कामे, पुढच्या पाच वर्षांत होणारी विकास कामे, सुटलेल्या समस्या आदींचा पाढा वाचून मतांचा जोगवा मागितला जात आहे. याउलट विरोधी पक्षाचा उमेदवार पाच वर्षांतील उणिवा शोधून त्यावर प्रहार करीत आहे; तसेच म तदारसंघातील सर्व समस्या सोडविण्यासाठी केवळ आपणच कसे सक्षम व एकमेव पर्याय आहोत, या अविर्भावात प्रचार करण्याचे पूर्वापार तंत्र अजूनही सुरूच आहे. मात्र काही मतदारसंघात तर थेट उमेदवारांच्या खाण्यापिण्याच्या सवयीपासून तर शारीरिक उंची व व्यंगावरही भाष्य करून प्रचाराचा स् तर खाली उतरविला जात आहे. त्याच बरोबर राजकीय पक्षाच्या प्रचारातून आजच्या जिल्ह्यातील प्रश्नाबाबत मौन बाळगल्या जात आहे. *सोयाबीनचे हाल बेदखलकपाशी व सोयाबीनच्याच पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. सध्या सोयाबीनवर किडीचे संकट असून, कपाशीला पाणी देण्यासाठी शेतात वीज नाही, हे संकट निवडणुकीच्या धामधुमीत दुर्लक्षित केले जात आहे.*जगाचा पोशिंदा आशेवरदरवर्षी शेती दगा देत आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, अशी संकटांची मालिका शेतकर्यांच्या मागे सुरू आहे. कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. जिल्ह्यात लाखो हातांना काम नाही. शेतीपूरक धंदे नाहीत. मतदारसंघातील समस्या जैसे थे आहेत. उद्या तरी नवी पहाट उगवेल, या आशेवर शेतकरी आहेत.
*उद्योगांची वाच्यता नाही जिल्ह्यातील खामगाव व मलकापूर येथील औद्योगिक वसाहत ही एकमेव एमआयडीसी आहे. परंतु येथेही आता पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. याशिवाय बुलडाणा, चिखली परिसरातील एमआयडीसीत सुविधा नसल्याने कोणतेही उद्योग नाहीत. त्यामुळे नवीन उद्योजक यायला तयार नाही त.