शेगाव: एसटी ची वाट बघत असताना बस स्थानकावर बसलेल्या एका ८0 वर्षीय वृध्दाची लुबाडणूक करणार्या निलंबीत एसटी चालकासह एकास १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा शेगाव न्यायालयाने शुक्रवारी सुनवली.३ डिसेंबर २0१३ रोजी देवराव सोनाजी शेगावकर वय ८0 रा.तिव्हाण बु. हे शेगावच्या एसटी बस स्थानकावर जानोरी एसटी ची वाट पाहत बसले असताना त्याठिकाणी अविनाश वंसतराव जोशी रा.अकोट जि.अकोला आणि इश्वर किसन ठाकुर रा.वरुड ता.बाभुळगाव जि.अकोला हे त्यांच्या शेजारी येवून बसले. त्यांनी त्यांच्याशी गप्पा मारत आपण ग्रामसेवक असुन ओळख करुन घेतली आणि आपल्या हातातील अंगठी खुपच चागली आहे. कोठे बनविली असे बोलुन त्यांच्या हातातील अंगठी घेतली व त्यांना खाण्यास पेढा दिला. पेढा दिल्यानंतर वृध्द शेगांवकर यांना गुंगी आल्याचे समजल्यावरुन भामट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याची असली अंगठी काढली व त्याजागी नकली अंगठी बोटात घातली. त्यांना चहा पिण्यासाठी बस स्थानक परिसरातील एका हॉटेल मध्ये नेले व चहा पाजुण तेथुन निघुन गेले.अशी फिर्याद देवराव सोनाजी शेगावकर यांनी शेगाव पो.स्टे.ला दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात दोघांविरुध्द अप.नं.१५७/१३ कलम ४२0,४0६,४0३,३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोळंके यांनी केल्यानंतर शेगाव न्यायालयात आरोपीतां विरोधात दोषारोपत्र दाखल करण्यात आले. यानंतर यामध्ये न्यायालयाने ५ साक्षीदार तपासले साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावा पाहता न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ वर्ष सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची कै द अशी शिक्षा न्यायमुर्ती सी.पी.महाजन यांनी सुनावली.सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता अब्दुल मतीन यांनी काम पाहीले .
एस.टी चालकासह एकास सश्रम कारावास
By admin | Updated: August 23, 2014 02:06 IST