चक्क मधुबाला विरोधात दिलीप कुमार यांनी कोर्टात दिली होती साक्ष, याच कारणाने तुटलं होतं नातं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 10:53 IST2020-08-11T10:38:22+5:302020-08-11T10:53:55+5:30

कामाबाबत बघा किंवा त्याच्या रिअल लाइफबाबत दिलीप कुमार यांच्या जगण्याला अनेक पैलू आहेत. दिलीप कुमार यांचं खाजगी जीवन खासकरून मधुबाला आणि त्यांच्या नात्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.

Tragedy king Dilip kumar and Madhubala relationship end court statement | चक्क मधुबाला विरोधात दिलीप कुमार यांनी कोर्टात दिली होती साक्ष, याच कारणाने तुटलं होतं नातं...

चक्क मधुबाला विरोधात दिलीप कुमार यांनी कोर्टात दिली होती साक्ष, याच कारणाने तुटलं होतं नातं...

ट्रॅजेडी किंग अभिनेते दिलीप कुमार यांचं जीवन हे कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नाही. कामाबाबत बघा किंवा त्याच्या रिअल लाइफबाबत दिलीप कुमार यांच्या जगण्याला अनेक पैलू आहेत. दिलीप कुमार यांचं खाजगी जीवन खासकरून मधुबाला आणि त्यांच्या नात्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. दोघांची मैत्री तराना सिनेमाच्या सेटवर झाली होती. आणि लवकरच त्यांची मैत्री प्रेमात बदलली. दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवू लागले होते. दिलीप कुमार मधुबालावर फिदा झाले होते आणि त्यांना तिच्याशी लग्न करायचं होतं.

पण प्रेमाच्या वाटेवर चालणं ही काही सोपी बाब नसते. मधुबालाच्या परीवारातील लोक हे नातं मान्य करायला तयार नव्हते. मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांचा तर या नात्याला कठोर विरोध होता. अशातच  बी.आर.चोप्रा यांच्या 'नया दौर' सिनेमाचं शूटींग सुरू झालं होतं. दिलीप कुमार आणि मधुबाला या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. सिनेमाच्या शूटसाठी दोघांनाही मध्य प्रदेशातील जायचं होतं. पण मधुबालाचे वडील यासाठी तयार नव्हते. त्यांना भीती होती की, दिलीप कुमार आणि मधुबालात जवळीकता वाढेल.

मधुबालाने कॉन्ट्रॅक्ट साइन केला होता आणि कॉन्ट्रॅक्ट तोडल्याने बी.आर.चोप्रा यांनी मधुबाला विरोधात कोर्टात केस केली. दिलीप कुमार यांनाही साक्ष द्यावी लागली होती. त्यावेळी त्यांनी जे घडलं किंवा जे सत्य आहे ते कोर्टासमोर मांडलं. मधुबालाची बाजू कमजोर पडू लागली होती. जर ती केस हरली असती तर तिला तुरूंगात जावं लागलं असतं म्हणून वेळेवर बी.आर.चोप्रा यांनी मन मोठं करत केस मागे घेतली. या घटनेनंतर अर्थातच मधुबाला आणि दिलीप कुमार यांचं नातं फार वाईट प्रभावित झालं होतं.

मधुबालाला असं वाटलं होतं की, दिलीप कुमार हे तिच्या बाजूने साक्ष देऊ शकले असते. पण त्यांनी बी.आर.चोप्रा यांना साथ दिली. पण दिलीप कुमार यांचे फॅन्स तेव्हा म्हणाले होते की, ट्रॅजेडी किंगने त्यावेळी कोर्टात खरं बोलण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचं फॅन्सकडून स्वागत केलं गेलं होतं.

हे पण वाचा :

असा आहे सुनील शेट्टीचा राजेशाही थाट, एकही सिनेमा न करता दरवर्षी कमावतो 100 कोटी!

बॉलिवूडमध्ये 'या' 10 मोठ्या कॅम्पचे राज्य, यांचेच सिनेमे करतात गलेलठ्ठ कमाई

सुशांत अन् रियाचे झाले होते कड्याकाचे भांडण; दोघांनीही एकमेकांवर उचलला होता हात

Web Title: Tragedy king Dilip kumar and Madhubala relationship end court statement