बॉलिवूडमध्ये 'या' 10 मोठ्या कॅम्पचे राज्य, यांचेच सिनेमे करतात गलेलठ्ठ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 04:55 PM2020-08-10T16:55:13+5:302020-08-10T17:12:06+5:30

इंडस्ट्रीतला 'नेपोटिज्म' आजचा नाही तर अनेक दशकांपासून आहे. रम्यान इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी खूप स्ट्रगल केल्यानंतर नाव कमावले आहे. 

10 Big Camp Dominates In The Film Industry; This Is Why Celeb Kids Get Over Talent Like Sushant. | बॉलिवूडमध्ये 'या' 10 मोठ्या कॅम्पचे राज्य, यांचेच सिनेमे करतात गलेलठ्ठ कमाई

बॉलिवूडमध्ये 'या' 10 मोठ्या कॅम्पचे राज्य, यांचेच सिनेमे करतात गलेलठ्ठ कमाई

googlenewsNext

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी अद्याप कोणतेही कारण समोर आलेले नाही. बॉलिवूडमध्ये सेलेब्स किड्सविषयी नेपोटिज्म आणि ऑऊटसाइडर्स विषयी होणाऱ्या गटबाजीचा विरोध मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना राणौत, विवेक ओबेरॉय, अभिनव कश्यप, अनुभव सिंह यांच्यासह सर्वसामान्य चाहत्यांनीही ट्विटरवर करण जोहर, सलमान खान यांच्याविरोधात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठवली आहे. सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील नेपोटिझम, गटबाजी जोरदार संतप्त प्रतिक्रया उमटत आहे. या प्रकरणी करण जोहर आणि सलमान खान दोघांवर निशाणा साधला आहे. बॉलिवूड वर्तुळात घराणेशाही अर्थात नेपोटीझमचा वाद चांगलाच पेटला. इंडस्ट्रीतला 'नेपोटिज्म' आजचा नाही तर अनेक दशकांपासून आहे. रम्यान इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी खूप स्ट्रगल केल्यानंतर नाव कमावले आहे. 

करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला इंडस्ट्रीत स्मार्ट प्रोड्युसर्स आहेत. हे कॉर्पोरेट निर्माते चित्रपटात स्वतःच्या खिशापेक्षा कॉर्पोरेट स्टुडिओचा पैसा गुंतवत असतात. कॉर्पोरेट स्टुडिओ या नियमावर काम करतात आणि ज्यांच्याजवळ जुना किंवा उदयोन्मुख कलाकार याला फारसे महत्त्व नसून सिनेमासाठी लावलेला पैसा कसा डबल होईल यावर त्यांचा भर असतो. सलमान खानने जावाई लव्हरात्री सिनेमातून आयुश शर्माला लॉन्च केले होते हे घराणेशाहीचे उत्तम उदाहरण आहे. 

बॉलिवूडचा गॉ़डफादर करण जोहरने तर सध्या स्टारकिडसना लॉन्च करण्याचा विडाच उचलला आहे. करण जोहर किंवा एखाद्याची मोठी कमाई तेव्हाच होते, जेव्हा त्यांच्या सिनेमांमध्ये आणि वेब शोमध्ये सोशल मीडियावर वर्चस्व असलेले मोठे चेहरे असतील.  हेच कारण आहे की, कोणत्याही स्टार किड्सला लाँच करण्यापूर्वी ते त्यांचे फेसबुक आणि ट्विटर अकाउंट्स मजबूत करतात. जान्हवी कपूरला करण जोहरनेच लॉन्च केले आणि अजून बरेच स्टारकिडसना लॉन्च करण्याच्या तो तयारी आहे.

यशराज  इंडस्ट्रीत सर्वाधिक प्रतिष्ठित मानले जाणारे बॅनर. प्रत्येकालाच या बॅनरसह काम करण्याची इच्छा असते. शाहरुखनंतर त्यांच्याजवळ रणवीर सिंह, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, भूमी पेडणेकर, अर्जुन कपूर यासारख्या टॅलेंटेड कलाकारांची  मोठी यादी आहे. 

साजिद नाडियाडवालांचा इंडस्ट्रीत एवढा दबदबा आहे की, सलमान, अक्षय कुमारसारखे सुपरस्टार त्यांचा शब्द टाळत नाही आणि त्यांच्या चित्रपटात काम करायला एका पायावर तयार असतात. नेहमी लोकप्रिय चेहरा घेवून सिनेमा बनवायचा आणि त्यातून भक्कड कमाई करायची हा एक उद्देश असल्याचे नेहमीच बोलले जाते. 

टी-सीरिजची काम करण्याची पद्धत काहीशी यशराजसारखीच आहे. ते कोणत्याही कॉर्पोरेट स्टुडिओसोबत कोलॅबरेट करीत नाही. स्वतःच चित्रपट बनवतात. असे म्हणतात की, युट्यूबमधूनच त्यांची 100 कोटींची कमाई सातत्याने सुरु असते. 

संजय लिला भन्साळी यांच्या चित्रपटाच्या निर्मितीपूर्वीच कमाईची वाटणी सुरू होते. साहजिकच सिनेमात लोकप्रिय चेहरा घेतला तर ओतलेला पैसा इनकॅश करण्या त्यांचा हातखंडा आहे.

बॉलिवूडमध्ये भट्ट कॅम्पही खूप प्रचलित आहे. त्यांच्या सिनेमातून नोवदित कलाकारीह समोर येतात पण कलाकारांनाही त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते असा नेहमीच वाद होताना दिसतो. 

Web Title: 10 Big Camp Dominates In The Film Industry; This Is Why Celeb Kids Get Over Talent Like Sushant.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.