Tiger Shroff shares stunning flying kick video Disha Patani commented on this | VIDEO : टायगर श्रॉफच्या फ्लाइंग किकवर फिदा झाली दिशा पटानी, दिली अशी रिअ‍ॅक्शन!

VIDEO : टायगर श्रॉफच्या फ्लाइंग किकवर फिदा झाली दिशा पटानी, दिली अशी रिअ‍ॅक्शन!

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफ आपल्या आपल्या धमाकेदार अ‍ॅक्शन आणि डान्ससाठी चांगलाच ल्रोकप्रिय आहे. तो नेहमीच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर त्याचे वर्कआउटचे फोटो-व्हिडीओ शेअर करत असतो. टायगर श्रॉफचा सध्याचा असाच एक फ्लाइंग  किक प्रॅक्टिसचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 

टायगर श्रॉफने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात आपल्या ट्रेनरसोबत तो फ्लाइंग किकची प्रॅक्टिस करत आहे. टायगर श्रॉफच्या या व्हिडीओवर त्याची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटानीने केलेली कमेंट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यासोबतच अनेक सेलिब्रिटीही त्याची ही फ्लाइंग किक पाहून अवाक् झाले आहेत. (म्हणे, सलमान खूपच गोड...! दिशा पटानी ‘भाईजान’वर फिदा, क्षणात दिला होकार)

अभिनेता टायगर श्रॉफ हा लॉकडाऊन काळात सोशल मीडियावर चांगलाच अ‍ॅक्टिव होता. नुकताच त्याने त्याचा एक म्युझिक व्हिडीओ शेअर केला होता. 'अनबिलिवेबल' असं या गाण्याचं टायटल असून यात टायगरने अफलातून डान्सही केला आणि गाणंही गायलं आहे. यावरही दिशा पटानीने 'Wow' अशी कमेंट केली होती. (दिशा पटानीने बटरफ्लाय किकचा व्हिडीओ केला शेअर, टायगर आणि त्याची आई म्हणाली....)

टायगरच्या वर्कफ्रन्डबाबत सांगायचं तर तो अखेरचा दिग्दर्शक अहमद खानच्या 'बागी ३' सिनेमात दिसला होता. तो आता 'हिरोपंती २' आणि 'रॅम्बो' सिनेमात धमाकेदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे दिशा सलमान खानच्या आगामी 'राधे' सिनेमात दिसणार आहे. नुकतंच या सिनेमाचं शूटींग पूर्ण झालंय.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tiger Shroff shares stunning flying kick video Disha Patani commented on this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.