अभिनेत्री कृति खरबंदाचा पोल डान्स व्हिडीओ व्हायरल, पुलकितने दिलं होतं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 03:38 PM2020-10-30T15:38:05+5:302020-10-30T15:42:55+5:30

कृतिला वाढदिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटी आणि फॅन्सकडून भरभरून शुभेच्छा मिळाल्या. ज्याच्या अनेक झलक तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

Taish actress Kriti Kharbanda has shared her video of the amazing pole dance | अभिनेत्री कृति खरबंदाचा पोल डान्स व्हिडीओ व्हायरल, पुलकितने दिलं होतं चॅलेंज

अभिनेत्री कृति खरबंदाचा पोल डान्स व्हिडीओ व्हायरल, पुलकितने दिलं होतं चॅलेंज

googlenewsNext

कृति खरबंदाने गूरूवारी तिचा ३०वा वाढदिवस साजरा केला. अशात 'हाउसफुल 4' च्या अभिनेत्रीचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कृति खरबंदा ही पोल डान्स करताना दिसते. हा डान्स करण्याचं तिला चॅलेंज मिळालं होतं.

कृतिला वाढदिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटी आणि फॅन्सकडून भरभरून शुभेच्छा मिळाल्या. ज्याच्या अनेक झलक तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. आपल्या बर्थडेच्या आधी कृति खरबंदाने पोल डान्सचा हा मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिच्या फॅन्सना चांगलाच आवडला आहे.

कृतिने हा व्हिडीओ शेअर  करत सांगितले की, हे डान्स चॅलेंज मला पुलकित सम्राटने दिलं आहे. आतापर्यंत कृतिच्या या व्हिडीओला १६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. पुलकित सम्राटने कृतिला दिलेलं चॅलेंज तिने अॅक्सेप्टही केलं आणि पूर्णही केलं.

'तॅश' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म zee5 वर रिलीज होणार आहे. ज्यात पुलकित सम्राट, कृति खरबंदा, हर्षवर्धन राणे, संजीदा शेख आणि जिम सराभ यांच्या मुख्य भूमिका असणार आहे.

पुलकितला डेट करतेय कृति

बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट अभिनेत्री कृति खरबंदाला डेट करतो आहे. लॉकडाऊनमध्ये दोघे एकत्र क्वॉलिटी टाईम स्पेंट करतायेत. राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार  एका मुलाखती दरम्यान पुलकित म्हणाला, लॉकडाऊनमध्ये आम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतो आहे. लॉकडाऊनमुळे आम्हाला एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची संधी मिळाली.

या दोघांनी 'वीर की वेडिंग' आणि 'पागलपंती' सिनेमात एकत्र काम केले आहे. दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. पुल्कित सम्राट आणि कृति खरबंदाच्या फॅन्सना त्यांचे हे फोटो प्रचंड आवडत असून याच फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा असते.
 

Web Title: Taish actress Kriti Kharbanda has shared her video of the amazing pole dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.