बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावून येत असतो. मग, तो सामान्य व्यक्ती असो किंवा दिग्गज कलाकार वा सहकलाकार. नुकतंच सलमान खानच्या दबंग चित्रपटातील त्याचा सहकलाकार दद्दी पांडे हिला दोन महिन्यांपूर्वी हृद्यविकाराचा झटका आला होता आणि त्याच्या संपूर्ण उपचाराचाा खर्च सलमाननं उचलला होता. आता दद्दी पांडे याने सलमान खानचे आभार मानले आहेत. 


स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, दद्दीला मुंबईतील त्याच्या घरी हृद्यविकाराचा झटका आला होता. त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. त्यानंतरचा त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सलमान खाननं उचलला.

दद्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून अद्याप ते सलमानला भेटले नसून किंवा त्याच्याशी अद्याप त्याचं बोलणं झालेलं नाही. दद्दी दबंग ३मध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या त्याला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.


दद्दी पांडे याने सलमान खानचे आभार मानले आहेत. तो म्हणाला की, सलमान खान खूप चांगला माणूस आहे. त्यांच्यासाठी जेवढं करू तितकं कमी आहे. ते ग्रेट व्यक्ती आहेत.


दबंग ३ चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभूदेवा करत असून या चित्रपटाची निर्मिती सलमान व त्याचा भाऊ अरबाज खान करत आहेत. अरबाजने चित्रपटाबद्दल सांगितले की, मी दबंग ३बद्दल खूप उत्सुक असून आम्ही प्रोसेसमध्ये खूप मज्जा करत आहोत. लोकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. ही खूप चांगली बाब आहे.  ६० टक्के शूटिंग पार पडलं आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत चित्रीकरण पूर्ण होईल.

हा चित्रपट २० डिसेंबरपर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.


Web Title: Salman Khan’s Dabangg co-star thanks actor for bearing expenses after heart attack: ‘He is a great man’
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.