नोरा फतेहीचा 'प्रीतम प्यारे' गाण्यावर अफलातून डान्स करून घातला धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 12:21 IST2020-07-23T12:21:27+5:302020-07-23T12:21:56+5:30

नोराच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवर हा डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १.३७ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

Nora Fatehi's dance on pritam pyare song video goes viral on social media | नोरा फतेहीचा 'प्रीतम प्यारे' गाण्यावर अफलातून डान्स करून घातला धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल

नोरा फतेहीचा 'प्रीतम प्यारे' गाण्यावर अफलातून डान्स करून घातला धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार डान्सने आपलं वेगळं स्थान निर्माण केलेली आणि कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावरही बरीत अॅक्टिव असते. दिलबर आणि साकी गर्ल म्हणनू लोकप्रिय असलेल्या नोराचा एका जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती 'प्रीतम प्यारे' या धमाकेदार गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे.

नोराच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवर हा डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १.३७ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. अक्षय कुमारचा 'राउडी राठोड' या सिनेमातील 'प्रीतम प्यारे' गाण्यावरील डान्स पाहून नोराचे फॅन्स तिचं भरभरून कौतुक करत आहेत.

दरम्यान, नोरा फतेही २०२० या वर्षावर फारच नाराज आहे. तिन या वर्षाला एखाद्या शिवीसारखं वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअरही केला होता. दुसरीकडे नोराने आपल्या बहारदार डान्सने सर्वांनाच भुरळ घातली आहे. आतापर्यंतची तिची सगळीच गाणी सुपरहिट झाली आहे.

आतापर्यंत तिची 'दिलबर', 'कमरिया', 'साकी साकी', 'एक तो कम जिंदगी' आणि 'गर्मी सॉन्ग' ही गाणी फारच गाजली. अजूनही तिची ही गाणी खासकरून तिच्या अफलातून डान्ससाठी पाहिली जातात. सिनेमात काम करण्याबाबत सांगायचं तर नोरा अजय देवगनसोबत 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये दिसणार आहे.

प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणसह अनेक सेलिब्रिटी पोलिसांच्या रडारवर! कारण ऐकून फॉलोअर्सला बसेल धक्का!!

दीपिका पादुकोण बनली सर्वात महागडी अभिनेत्री, प्रभाससोबतच्या सिनेमासाठी घेतले इतके कोटी  

Web Title: Nora Fatehi's dance on pritam pyare song video goes viral on social media