प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणसह अनेक सेलिब्रिटी पोलिसांच्या रडारवर! कारण ऐकून फॉलोअर्सला बसेल धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 10:50 AM2020-07-23T10:50:05+5:302020-07-23T10:51:15+5:30

मुंबई पोलिस लवकरच दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा अशा काही बड्या स्टार्सची चौकशी करू शकतात.

priyanka chopra and deepika padukone and others bollywood celebes will be interrogated by mumbai police in fake and paid social media followers scam | प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणसह अनेक सेलिब्रिटी पोलिसांच्या रडारवर! कारण ऐकून फॉलोअर्सला बसेल धक्का!!

प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणसह अनेक सेलिब्रिटी पोलिसांच्या रडारवर! कारण ऐकून फॉलोअर्सला बसेल धक्का!!

googlenewsNext
ठळक मुद्देइन्स्टाग्रामचे बोलाल तर प्रियंकाचे एकूण 5.25 कोटी फॉलोअर्स आहेत. तर दीपिका पादुकोणचे 5.08 कोटी फॉलोअर्स आहेत.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरु आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या महिनाभरात  30 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केलीय. आता बॉलिवूडचे काही दिग्गज स्टार्स मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत. अर्थात सुशांतच्या मृत्यूप्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नाही. या स्टार्सवर सोशल मीडियावर पैसे देऊन फेक फॉलोअर्स खरेदी केल्याचा आरोप आहे. ताजी खबर खरी मानाल तर याप्रकरणी पोलिस लवकरच दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा अशा काही बड्या स्टार्सची चौकशी करू शकते.

मुंबई पोलिसांनी 54 अशा कंपन्यांचा छडा लावल आहे ज्या पैसे घेऊन फेक फॉलोअर्स विकतात. फॉलोअर्स खरेदी करणा-या लोकांची इमेज उंचावण्यासोबत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांची इमेज डॅमेज करण्यासाठी या कंपन्या कुठल्याही स्तराला जाऊ शकतात. मुंबई पोलिसांचे ज्वॉइंट कमिशनर विजय कुमार चौबे यांनी याप्रकरणी क्राईम ब्रॅन्च आणि सायबर सेलचीही मदत घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटने अलीकडे याप्रकरणी अभिषेक दिनेश दौडेला अटक केली होती. त्याच्यावर फेक सोशल मीडिया अकाऊंट्स बनवण्याचा आरोप आहे.
पोलिस सध्या एका सोशल मीडिया मार्केटींग कंपनीवरही लक्ष ठेवून आहेत. अभिषेक दिनेश दौडेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो एका विदेशी कंपनीसाठी काम करतो. काही दिवसांपूर्वी गायिका भूमी त्रिवेदीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. तिच्या नावावर एक फेक प्रोफाईल असल्याचा आरोप तिने आपल्या तक्रारीत केला होता.

176 हाय प्रोफाईल लोक
मुंबई पोलिसांना आपल्या तपासादात 176 हाय प्रोफाईल लोक सापडले आहेत. ज्यांच्यावर पैसे देऊन फेक फॉलोअर्स खरेदी करण्याचा आरोप आहे. यात बॉलिवूड सेलिब्रिटींसह काही खेळाडूंचाही समावेश आहे. आता या 176 च्या यादीत कोणकोणती नावे आहेत, ते बघूच

सोशल मीडियावर इतके आहेत प्रियंका व दीपिकाचे फॉलोअर्स
इन्स्टाग्रामचे बोलाल तर प्रियंकाचे एकूण 5.25 कोटी फॉलोअर्स आहेत. तर दीपिका पादुकोणचे 5.08 कोटी फॉलोअर्स आहेत.
 

Web Title: priyanka chopra and deepika padukone and others bollywood celebes will be interrogated by mumbai police in fake and paid social media followers scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.