VIDEO : नोरा फतेही आणि गुरू रंधावाचं धमाकेदार Naach Meri Rani गाणं रिलीज, तिचा वेगळा अंदाज पाहून फॅन्स फिदा...

By अमित इंगोले | Updated: October 20, 2020 13:34 IST2020-10-20T13:30:19+5:302020-10-20T13:34:37+5:30

नोराचे वेगवेगळ्या गाण्यांवरील डान्स तुम्ही पाहिले असतील, पण या गाण्यात तिच्या डान्सचा वेगळा अंदाज बघायला मिळतो. तर गुरूने गाणंही कमाल गायलं आहे.

Nora Fatehi and Guru Randhawa Naach Meri Rani song release video trending on Youtube | VIDEO : नोरा फतेही आणि गुरू रंधावाचं धमाकेदार Naach Meri Rani गाणं रिलीज, तिचा वेगळा अंदाज पाहून फॅन्स फिदा...

VIDEO : नोरा फतेही आणि गुरू रंधावाचं धमाकेदार Naach Meri Rani गाणं रिलीज, तिचा वेगळा अंदाज पाहून फॅन्स फिदा...

बॉलिवूड अभिनेत्री - डान्सर नोरा फतेही आणि प्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावा यांच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला 'नाच मेरी राणी' चा म्युझिक व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. या गाण्यात नोराच्या अफलातून डान्सचं आणि गुरू रंधावाच्या गायकीचं जबरदस्त कॉम्बिनेशन बघायला मिळतंय.  

नोराचे वेगवेगळ्या गाण्यांवरील डान्स तुम्ही पाहिले असतील, पण या गाण्यात तिच्या डान्सचा वेगळा अंदाज बघायला मिळतो. तर गुरूने गाणंही कमाल गायलं आहे. या गाण्याची दोघांचेही फॅन्स आतुरतेने वाट बघत होते. आणि हे गाणं रिलीज होताच काही वेळातच साडे चार लाखांपेक्षा अधिक व्ह्यूजही मिळाले आहेत. या गाण्यात नोराने एका रोबोटची भूमिका साकारली आहे. हा रोबोट गुरू रंधावा असेंबल करत आहे. (नोरा फतेहीचा इन्स्टाग्रामवरचा विचित्र DP पाहून हैराण झाले फॅन्स; म्हणाले, हे काय?)

नोरा फतेही आणि गुरू रंधावाचं हे गाणं 'नाच मेरी राणी' तनिष्क बागचीने लिहिलं आहे. तर गाणं गुरू रंधावा आणि निकीता गांधीने गायलं आहे. या गाण्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. हे गाणं टी सीरीजने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज केलं आहे. (नोरा फतेहीने 'कमरियाँ' गाण्यावर ठुमके लावताच, फॅन्स झाले क्रेझी)

नोराने हे गाणं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत नोराने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'बूम, नाच मेरी राणी रिलीज झालं आहे'. नोरा फतेही आणि गुरू रंधावा यांचा हा वेगळा अंदाज दोघांच्याही फॅन्सना पसंत पडत आहे. तसेच नोराचा एक वेगळा अंदाजही या गाण्याच्या माध्यमातून बघायला मिळाला.
 

Web Title: Nora Fatehi and Guru Randhawa Naach Meri Rani song release video trending on Youtube