ठळक मुद्देनोरा फतेही काही दिवसांपूर्वी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये जजची भूमिका साकारताना दिसली होती.

बॉलिवूड अभिनेत्री व डान्सर नोरा फतेही गेल्या काही दिवसांपासून जाम चर्चेत आहे. ‘इंडियाज् बेस्ट डान्सर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये धम्माल केल्यानंतर सध्या नोरा सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेय. आपल्या शानदार अदांनी चाहत्यांवर मोहिनी घालणारी नोरा सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. सध्या तिचा एक फोटो चर्चेचा विषय बनला आहे. हे काय? असा सवाल हा फोटो पाहिल्यानंतर चाहते विचारू लागले आहेत.
आता या फोटोची काय भानगड आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर नोराने इन्स्टाग्रामवर प्रोफाईल फोटो अर्थात डीपी बदलला. इन्स्टावर तिने स्वत:चा फोटो लावण्याऐवजी असा काही विचित्र रोबॉटिक स्ट्रक्चरचर फोटो लावला की, पाहणारे थक्क झालेत. हा फोटो एखाद्या रोबोटसारखा दिसतोय.

या फोटोसोबत नोराने तिच्या इन्स्टा बायोमध्येही असेच काही विचित्र लिहिले आहे. Obbdi Nfsj Sboj 20.10.20असे तिने लिहिले आहे. हे सगळे चाहत्यांच्या समजण्यापलीकडचे आहे. आता या डीपी मागे नेमकी काय स्टोरी आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.


पंजाबी सिंगर गुरु रंधावा आणि म्युझिक कंपनी टी-सीरिजनेही आपल्या आॅफिशिअल इन्स्टाग्रामवर हाच फोटो लावला आहे. 20.10.20 ला नोरा व गुरुचे ‘नाच मेरी रानी’ हे गाणे रिलीज होतेय. कदाचित हा फोटो याच गाण्याच्या प्रमोशनचा भाग असावा, असे काहींचे मत आहे.
नोराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर,अजय देवगणच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात ती झळकणार आहे. दिलबर,कमरिया,साकी साकीआणि एक तो कम जिंदगानी या गाण्यांनी नोरा फतेहीने बॉलिवूड जगात आपले एक वेगळे स्थान निर्माण केली आहे. 

टेरेंस लुईसने नोरा फतेहीला चुकून केला होता स्पर्श?
नोरा फतेही काही दिवसांपूर्वी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये जजची भूमिका साकारताना दिसली होती. यादरम्यानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता आणि हा व्हिडीओ पाहून नेटक-यांची पुरती सटकली होती. होय, या व्हिडीओत कोरिओग्राफर टेरेंस लुईस नोराला कथितरित्या आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करताना दिसत होता. मग काय नेटक-यांनी टेरेंस लुईसला जबरदस्त ट्रोल केले होते. 

नोरा फतेहीचा गुरू रंधावासोबतच डान्स व्हिडीओ लीक, लवकरच होणार आहे धमाका...

VIDEO : ना स्टेज ना पब्लिक नोरा पार्कमध्येच करू लागली जबरदस्त डान्स, फॅन्सची उडाली झोप!

टेरेंस लुईसने नोरा फतेहीला चुकून केला होता स्पर्श? कोरिओग्राफरने सांगितले त्या आक्षेपार्ह व्हिडीओमागचे सत्य

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: dilbar girl nora fatehi instagram dp leaves everyone intrigued t-series music video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.