६ जुलैला पैसे कपाटात ठेवले, ९ जुलैला पाहते तर...; अभिनेत्रीच्या घरात चोरी; घरगड्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 09:40 IST2025-07-13T09:39:44+5:302025-07-13T09:40:02+5:30
कशिश ही मूळची बिहारची रहिवासी असून, अंधेरीतील न्यू आंबिवली सोसायटीमध्ये राहते. तिने ‘बिग बॉस’सारख्या काही टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

६ जुलैला पैसे कपाटात ठेवले, ९ जुलैला पाहते तर...; अभिनेत्रीच्या घरात चोरी; घरगड्यावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरी परिसरात राहणारी अभिनेत्री कशिश कपूर हिच्या घरात चोरी केल्याप्रकरणी घरगडी सचिनकुमार चौधरी याच्याविरोधात अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कशिश ही मूळची बिहारची रहिवासी असून, अंधेरीतील न्यू आंबिवली सोसायटीमध्ये राहते. तिने ‘बिग बॉस’सारख्या काही टीव्ही शोमध्ये काम केले आहे. आरोपी चौधरी हा गेल्या पाच महिन्यांपासून तिच्या घरी काम करत होता. तिच्या तक्रारीनुसार, ६ जुलैला तिने घरातील कपाटात सात लाख रुपये ठेवले होते. मात्र, गावी तिच्या आईला काही पैशांची गरज असल्याने मदत करण्यासाठी तिने ९ जुलैला कपाट उघडले असता तिला फक्त अडीच हजार रुपये सापडले. तिने संपूर्ण कपाट तपासून पाहिले; मात्र पैसे कुठेच सापडले नाही. अखेर तिने चौधरी याला याबाबत विचारले तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तिचा संशय बळावला आणि तिने पोलिसांत तक्रार दिली.