'झऱ्याखाली भिजल्यावर निर्मात्यांवर पैशांचा पाऊस व्हायचा'; बोल्ड सीनवर पहिल्यांदाच झीनत अमान व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 12:46 PM2021-12-07T12:46:27+5:302021-12-07T12:47:03+5:30

Zeenat aman: या शोमध्ये कपिलने झीनत यांना 'भीगी भीगी रातों में', 'हाय हाय ये मजबूरी' या गाण्यांविषयी काही प्रश्न विचारले.

kapil sharma asked zeenat aman did you ever ask your director do you think i do not bathe at home | 'झऱ्याखाली भिजल्यावर निर्मात्यांवर पैशांचा पाऊस व्हायचा'; बोल्ड सीनवर पहिल्यांदाच झीनत अमान व्यक्त

'झऱ्याखाली भिजल्यावर निर्मात्यांवर पैशांचा पाऊस व्हायचा'; बोल्ड सीनवर पहिल्यांदाच झीनत अमान व्यक्त

googlenewsNext

आपल्या सौंदर्याच्या आणि मादक अदांच्या जोरावर एकेकाळी संपूर्ण चित्रपटसृष्टी दणाणून सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे झीनत अमान (zeenat aman).  हिंदी कलाविश्वात त्यांनी  पहिल्यांदा 'सेक्स सिम्बॉल' अशी ओळख मिळवलं. विशेष म्हणजे त्यांच्या अभिनयाची आजही चाहत्यांमध्ये चर्चा होते. अलिकडेच झीनत अमान यांनी प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (kapil sharma) याच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पावसातील व झऱ्याखाली शूट झालेल्या बोल्ड सीनविषयी त्यांचं मत मांडलं आहे.

सध्या सोशल मीडियावर द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये कपिल शर्माच्या मंच्यावर झीनत अमान यांच्यासह पूनम ढिल्लो आणि अनिता राज यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे यावेळी कपिलने मुद्दाम झीनत यांना झऱ्याखालील बोल्ड सीनविषयी प्रश्न विचारला. मात्र, त्यावर अभिनेत्रीने दिलेल्या उत्तरामुळे कपिल क्लीन बोल्ड झाला आहे.

या शोमध्ये कपिलने झीनत यांना 'भीगी भीगी रातों में', 'हाय हाय ये मजबूरी' या गाण्यांविषयी काही प्रश्न विचारले. "झीनत जी तुम्ही कधी झऱ्याखाली अंघोळ करतांना दिसलात तर कधी पावसात भिजतांना. पण, मी अंघोळ करुन येत नाही असं तुम्हाला वाटतंय का? असा प्रश्न तुम्ही कधीच दिग्दर्शकांना विचारला नाही का?", असा मजेशीर प्रश्न कपिलने विचारला. यावर झीनत यांनी हटके उत्तर दिलं.

"कोणीतरी मला एका गोष्ट सांगितली होती की, ज्यावेळी मी झऱ्याखाली किंवा पावसात भिजते त्यावेळी निर्मात्यांवर पैशांचा पाऊस होतो", असं उत्तर झीनत यांनी कपिलला दिला. विशेष म्हणजे झीनत यांच्या उत्तरामुळे कपिलची बोलती बंद झाली. मात्र, उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ माजला.

Web Title: kapil sharma asked zeenat aman did you ever ask your director do you think i do not bathe at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.