शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४३४ विहिरींवर दोन कोटींचा खर्च

By admin | Updated: July 2, 2015 00:42 IST

शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू आहेत.

रोजगार हमी योजना : सिंचन विहिरींमुळे शेतकऱ्यांना लाभ, तीन लाखांचे अनुदानदेवानंद नंदेश्वर भंडाराशेती व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन सुविधा बळकट करण्यास हातभार लागत आहे. अनेकांच्या शेतात विहिरीमुळे सिंचनाचे साधन उपलब्ध झाले असून चालू वर्षात जिल्ह्यात रोहयोच्या माध्यमातून ४३४ विहिरींचे बांधकाम झाले. या विहिरींवर तब्बल १ कोटी ९० लाख ५८ हजारांचा खर्च झाला आहे. सिंचन सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना शेतपीक घेण्यासाठी प्रोत्साहीत करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. विहिरीचे काम हे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केल्या जात असून विहिर बांधकामासाठी यापुर्वी मिळणारे १.९९ लाखांचे अनुदान वाढवून या वर्षीपासून ३ लाख रुपए अनुदान करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल सिंचन विहिर बांधकामाकडे वाढला आहे. यापुर्वी सिंचन विहिरीसाठी केवळ १.९९ लाख रुपये अनुदान मिळायचे. या अनुदानात अनेकांच्या विहिरीचे बांधकाम अपुर्ण असायचे. काही ठिकाणी दगड लागल्यास त्या विहिरीच्या बांधकामास अधिक खर्च यायचा. त्यामुळे शेतकरी विहिर बांधकामास निरूत्साही असायचे. मात्र अनुदान वाढविण्याचा शासनाने निर्णय घेताच लाभार्थ्यांची संख्या वाढली असून अनेकांच्या शेतात आता विहिरी निर्माण झाल्या आहेत. २०१४-१५ या वर्षांत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहीर बांधकामासाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडे प्राप्त झाले. भूजल सर्व्हेक्षण विभागाने प्रस्तावांना बांधकामाची मान्यता दिली. १,१६४ विहिरींचे कामे अपुर्ण असून काही ठिकाणी दगड लागले तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या विहिरींवर तब्बल २ कोटी ८८ लाख ७ हजारांचा खर्च झाला आहे. या विहिरींचे बांधकाम लवकरच पुर्ण करण्यात येईल, अशी माहिती रोजगार हमी योजना जिल्हा नियंत्रण कक्षाने 'लोकमत'ला दिली. सध्यस्थितीत ७९ विहिरींसाठी ८१ लाख २२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. २०१४-१५ मधील अपूर्ण विहिरी व यावर्षी प्रस्ताविक विहिरी पुर्ण करण्यात येईल,अशी माहिती रोजगार हमी योजना जिल्हा नियंत्रण कक्षाने दिली. लाखांदूर तालुक्याची आघाडीरोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर बांधकामात लाखांदूर तालुक्याने आघाडी घेतली आहे. या तालुक्यात १३९ विहिरींचे बांधकाम पुर्ण झाले आहे. तर ८१ विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यापाठोपाठ भंडारा तालुक्यात १०५ विहिरींचे बांधकाम पुर्ण झाले आहे. सर्वात कमी केवळ १३ विहिरींचे बांधकाम पवनी तालुक्यात पुर्ण झाले आहे.निधी मिळण्यास अडचणी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचनाचे साधन उपलब्ध होत असले तरी अनेक शेतकऱ्यांना दस्ताऐवजाची पुर्तता करूनही निधी मिळण्यास अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रस्ताव सादर करून दोन ते तीन वर्ष झाले. मात्र प्रस्तावावर कार्यवाही झालेली नसल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने सिंचन विहिरींचे प्रस्ताव लवकर निकाली काढण्याची मागणी आहे.