ग्रामस्थांशी साधला संवाद : जंगलात जाऊन वन विभागाच्या कामाचीतुमसर : राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या निदेशानुसार दर आठवड्याला जिल्ह्यातील एका तालुक्यातील गावात ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून मुक्काम करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल लेंडेझरी येथे दि.३0 शुक्रवारी भंडार्याच्या जिल्हाधिकारी, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्कामी होते. शुक्रवारी रात्री ८ वाजता त्यांचे आगमन झाले व शनिवारी दुपारी दोनपर्यंत त्यांनी या भेटीत ग्रामस्थांशी संवाद विभाग प्रमुखांना निर्देश, बैठक, प्राथमिक आरोग्य केंद्र, रोपवन वाटीकेला भेट दिली.जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, जि.प. चे कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल लेंडेझरी येथे शुक्रवारी रात्री ८ वाजता सुमारास आगमन झाले. त्यांच्यासोबत तुमसरचे तहसीलदार सचिव यादव तथा विविध विभागाचे विभाग प्रमुख होते. जिल्हाधिकार्यांचा रात्री मुक्काम लेंडेझरी येथील वनविभागाच्या विश्रामगृहात होता. रात्रीच तहसीलदार, वनविभागाचे अधिकारी तथा इतर अधिकार्यांची बैठक रात्री ८.३0 ला त्यांनी घेतली. शनिवारी सकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर विभाग प्रमुखांसोबत लेंडेझरी येथे शिवार फेटी केली. सकाळी ९ ते १0 पर्यंत लेंडेझरी येथील शाळेत ग्रामस्थांशी संवाद साधला. यात गावातील समस्या, पाणी, शेतीचे पाणी, श्रावणबाळ योजनेचे शिबिर लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या बैठकीला गावातील ७0 ते ८0 नागरिक उपस्थित होते. त्यानंतर वनविभागाची रोपवाटीकेची पाहणी केली. काही कामे येथे आहेत काय, असा प्रश्न जिल्हाधिकार्यांनी वनपरिक्षेत्राधिकारी कुलकर्णी यांना केला. जून्या विहीरींचा गाळ, पाणीपुरवठय़ाची विहीर याबाबत चर्चा झाली.जिल्हाधिकार्यांनी लेंडेझरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून रुग्णांशी चर्चा केली. रोजगार हमी कामांना भेटी देवून तहसीलदार सचिव यादव यांचेकडून माहिती घेतली. दुपारी २.३0 वाजता जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे तथा इतर विभागप्रमुख रवाना झाले.रात्री मुक्कामी गावांचा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवावा लागणार असून दर आठवड्याला व्हिडीओ कॉन्फरसींग सुद्धा या मुक्काम स्थळाबाबत मुख्य सचिव माहिती घेण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी माधवी खोडे यांनी प्रत्येक विभागाची स्वतंत्र व सविस्तर माहिती येथे घेतल्याने विभाग प्रमुख सतर्क होते. (तालुका प्रतिनिधी)
जिल्हाधिकार्यांचा आदिवासीबहुल लेंडेझरीत मुक्काम
By admin | Updated: May 31, 2014 23:14 IST