२५ शिक्षक अद्यापही सुटीवरपवनी : भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकाच्या ३७६ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी ३५१ शिक्षक बदलीचे ठिकाणी रूजू झाले. त्यांच्या बदल्या न्यायालयाचे निर्णयाचे अधिन राहून करण्यात आल्याचे शासन आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यामुळे बदल्यांचा गुंता अखेर सुटला आहे. बदलीच्या ठिकाणी हजर न झालेले २५ शिक्षक अद्यापही सुटीवर असून मुंबई उच्य न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगनादेश उठल्यावर व न्यायालयाचे निर्णयाचे अधिन राहून त्यांच्या बदलीचे ठिकाणी हजर होण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे.भंडारा जिल्हा परिषद सभागृहात ११, १२ व १३ मे रोजी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ३७६ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या होत्या. जिल्हातंर्गत बदल्यांना राज्य शासनाने ८ जून रोजी स्थगिती दिलेली होती. ती स्थगिती २६ जुलैच्या शासन पत्रान्वये रद्द करण्यात आलेली होती. जिल्हांतर्गत बदल्यासंदर्भात नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालानुसार ३७६ शिक्षकांचे बदल्या झालेल्या असून त्यापैकी ३५१ शिक्षक बदलीच्या ठिकाणी रूजू झाले आहेत. त्यांच्या बदल्या न्यायालयीन निर्णयाचे अधीन राहून कायम करण्यात येत आहेत. उर्वरीत २५ शिक्षकांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी न्यायालयाचा स्थगनादेश उठल्यावर व न्यायालयाच्या निर्णयाचे अधीन राहून सात दिवसांची मुदत देण्यात येत आहे, असे शासन आदेशात नमुद करण्यात आलेले आहे. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यातील ३५१ शिक्षकांच्या बदल्या बदलीचा गुंता अखेर सुटला :
By admin | Updated: July 28, 2016 00:27 IST