शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

जिल्हा रुग्णालयात दररोज हजारांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:12 IST

दिवसा प्रचंड उन आणि रात्री निर्माण होणाऱ्या गारव्याने शहरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून दररोज जवळपास एक हजार रुग्णांची बाह्य रुग्ण विभागात नोंद होत आहे.

ठळक मुद्देवातावरणातील बदल : गावागावांत आजार आणि घराघरात रुग्ण, खासगी रुग्णालयातही वाढली गर्दी

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवसा प्रचंड उन आणि रात्री निर्माण होणाऱ्या गारव्याने शहरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून दररोज जवळपास एक हजार रुग्णांची बाह्य रुग्ण विभागात नोंद होत आहे. वाढत्या गर्दीने रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने अनेक जण आर्थिक परिस्थिती नसतानाही खासगी रुग्णालयाचा रस्ता धरत आहेत. सध्या वातावरणातील बदलाने गावागावांत आजार आणि घराघरात रुग्ण दिसत आहेत.पावसाने दडी मारल्यापासून वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. गत दीड महिन्यांपासून दररोज उन्हाळ्यासारखी उन्ह तापत आहे. गत आठवडाभरापासून रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पहाटे बोचरी थंडी ग्रामीण भागात जाणवते. या विषम वातावरणामुळे आजाराने डोके वर काढले आहे. डोकेदुखी, सर्दी, पडसे, ताप यासह विविध आजाराचे रुग्ण गावागावात दिसून येत आहेत. अंग कणकण वाटायला लागले की रुग्ण सुरुवातीला एखादी गोळी घेऊन घरगुती उपचार करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यातून बरे वाटले नाही की रुग्णालयात धाव घेते. ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतात. मात्र या ठिकाणी त्यांना समाधानकारक उपचार मिळत नाही. त्यामुळे सर्वांची धाव भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे असते. शुक्रवारी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात ११४० रुग्णांची नोंद झाली. तर शनिवारी ९४३ रुग्ण येथे उपचारासाठी आले. या गर्दीवरूनच ग्रामीण भागात आजार किती मोठ्या प्रमाणात बळावले हे दिसून येते.आजारी रुग्णांमध्ये सर्वाधिक बालक आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात वेळेवर उपचार होत नसल्याचे कायम ओरड आहे. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात नाईलाजाने धाव घ्यावी लागते. शहरातील बाल रुग्णालयात पाय ठेवायलाही जागा नाही. विविध चाचण्या करून उपचार करण्याच्या पद्धतीने रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा तर पुरता बोजवारा उडाला आहे. बाह्य रुग्ण विभागात डॉक्टर वेळेवर येत नाही. रात्रीच्या वेळी तर शिपायाशिवाय रुग्णालयात कुणीही भेटत नाही. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा कारभारही गत काही दिवसांपासून ढेपाळल्याचे जाणवत आहे.जिल्हा रुग्णालयाला घाणीचा विळखाभंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला घाणीचा विळखा पडल्याचे दिसून येते. रुग्णांसोबत असणाºया नातेवाईकांचा रुग्णालयाला कायम गराडा पडलेला असतो. खर्रा, पानाच्या पिचकाºया आणि तंबाखू यामुळे रुग्णालयाच्या भिंती रंगल्या आहेत. रुग्णालयातील प्रसाधनगृहाचीही अवस्था अतिशय वाईट आहे. रुग्णालयाच्या परिसरात रस्त्यावर पार्कींग केली जाते. रुग्णालय परिसरात कायम दुर्गंधी असते.शिस्तीसाठी हवेत डॉक्टर मालेभंडारा येथील जिल्हा रुग्णालयात चार वर्षापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.एकनाथ माले कार्यरत होते. शिस्तप्रिय असलेल्या डॉक्टरांनी या रुग्णालयालाही शिस्त लावली होती. या ठिकाणी येणाºया प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांनी तपासणी केली जात होती. तंबाखू, खर्रा आदी एका बॉक्समध्ये टाकल्या जात होता. तसेच अंतर्गत आणि बाह्य स्वच्छताही दररोज होत होती. आता येथील गचाळ अवस्था पाहून येथे जाणाºया प्रत्येकांना डॉक्टर एकनाथ माले यांची प्रकर्षाने आठवण येते.जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र पूर्वीच्या तुलनेत ती कमीच आहे. विविध रिक्त पदांमुळे कार्यरत डॉक्टर व कर्मचाºयांवर कामाचा ताण येत आहे. रिक्त पदासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असून लवकरच या बाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.-डॉ.माधुरी थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय