लोकमत न्यूज नेटवर्कसासरा : गतवर्षी हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या धानापेक्षा यंदा एक किलो जरी धान कमी खरेदी झाला तर संपूर्ण साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करु, असे आमदार बाळा काशिवार यांनी सांगितले.साकोली तालुक्यातील सानगडी येथे आदर्श भात गिरणी आधारभूत धान खरेदी केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. भंडारा जिल्ह्यातील लाखनी, पवनी, मोहाडी या तीन तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने घोषीत केले. लाखनी व साकोली तालुक्याची भौगोलिक स्थीती सारखी आहे. असे असतानाही साकोली तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले. हा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी आमदार काशिवार म्हणाले, गतवर्षीच्या हमीभाव धान खरेदीपेक्षा यावर्षी १ किलो जरी धान खरेदी कमी झाली तर संपूर्ण साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करु, असे सांगितले. त्यावर शेतकऱ्यांनी हे कितपत बरोबर आहे. अशी प्रतिक्रिया दिली.यासोबतच सानगडी परिसरातील वीज पुरवठ्याची कैफियत मांडली. शेतकरी म्हणाले कृषी पंपाला आठ तास वीज पुरवठा होत आहे. भारनियमनामुळे ओलीत करणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी केली. यासोबतच तलाव बोळ्या पाण्याअभावी तहानलेल्या आहे. सिंचन कसे करावे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी साकोली तालुका दुष्काळग्रस्त करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.यावेळी जयभोले शेतकरी संघटना सानगडीच्यावतीने आमदार बाळा काशिवार यांना निवेदनही देण्यात आले.
-तर साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:53 IST
गतवर्षी हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या धानापेक्षा यंदा एक किलो जरी धान कमी खरेदी झाला तर संपूर्ण साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करु, असे आमदार बाळा काशिवार यांनी सांगितले.
-तर साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करू
ठळक मुद्देबाळा काशिवार : सानगडी येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ