स्वातंत्र्य दिनाचा सोहळा हा अमृत महोत्सवी सोहळा आहे आणि म्हणून केंद्र व राज्य शासनाने या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त जनतेला सहभागी करून घ्यावे अशा प्रकारचे निर्देश दिले होते. मात्र त्याच वेळेस साकोली नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ही परंपरा मोडीत काढून फक्त श्रेष्ठ प्रतिष्ठित नागरिकांचीच अवहेलना केली असे नव्हे तर अमृत महोत्सवी स्वातंत्र्य सोहळ्यात केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ही चूक लहानशी चूक नाही. मात्र त्याच वेळी हे जाणीवपूर्वक ठरवून केले आहे की काय, अशीसुद्धा शंका यायला फार वाव आहे. असे कळले आहे की, नगराध्यक्षांनी आपल्या मोबाइलवर सुबक आमंत्रण पत्रिका तयार करून त्या ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत त्याच पक्षाचे कार्यकर्ते सामील असलेल्या मोबाइल ग्रुपवर त्यांनी हे निमंत्रण पाठवले. म्हणजे जाणीवपूर्वक स्वातंत्र्य सोहळा हा एका पक्षाचा सोहळा करायचे होते की काय, हेही त्यावरून समजतें. ही शासकीय अधिकाऱ्यांची फार मोठी कर्तव्यात चूक आहे. जबाबदार असलेल्या साकोली नगर परिषद अधिकाऱ्यांची जबाबदारी ‘फिक्स’ करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:38 IST