शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: June 29, 2015 00:46 IST

शाळेत जाण्यासाठी पालक विश्वासाने आपल्या चिमुकल्यांना व्हॅनचालकाच्या हवाली करतात.

अनेक स्कूल व्हॅन बेलगाम : नियमांचे सर्रास उल्लंघनभंडारा : शाळेत जाण्यासाठी पालक विश्वासाने आपल्या चिमुकल्यांना व्हॅनचालकाच्या हवाली करतात. मात्र त्यांच्या काळजाचा तुकडा चक्क स्कूल व्हॅनमधून नव्हे तर, एका धोकादायक व्हॅनमधून प्रवास करतो आहे. याची फार कमी जणांना जाणीव असते. स्कूल व्हॅनमधून रोज हजारो चिमुकल्यांचा हा जीवघेणा प्रवास सुरू आहे. ज्या वाहनात आपण बसलो त्याचा कधीही घात होऊ शकतो, या निष्पाप जीवांना माहितही नसते. मात्र याची पुरेपूर कल्पना असलेले पालक, चौकातील वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांना असतानाही ते दुर्लक्ष करीत असल्याने हा जीवघेणा प्रवास राजरोसपणे सुरू असल्याचे दाहक वास्तव आहे.विद्यार्थी वाहतुकीला संवेदनशील वाहतूक म्हणून ओळखले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनसाठी विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली आहे. विद्यार्थी हे स्कूल व्हॅनमधून प्रवास करतात. परंतु शहरात धावणाऱ्या ६० टक्के स्कूल व्हॅनचालक नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र आहे. स्कूल बसची आसन क्षमता २८ सिटर बसमध्ये ४२ ची असते. तर काही गाड्यांची क्षमता त्यांच्या क्षमता बांधनिनुसार ठेवण्यात आलेली आहे. आसन क्षमता मूळ आसन क्षमतेच्या दीडपट असताना शेळ्यामेंढ्या कोंबाव्यात तशाप्रकारे एकावेळी मुले बसवली जातात. यासाठी मूळ आसनामध्ये बदल करतात. व्हॅनमधील आसनाच्या कुठल्याही बाजूला आधारासाठी हॅन्डल असावे, असा नियम असताना अनेक व्हॅनमध्ये ते राहत नाही, दप्तरे ठेवण्यासाठी जागा नसल्याने विद्यार्थी मांडीवर दप्तर घेऊन बसतात.जिल्ह्यात विद्यार्थ्यांना स्कुलमध्ये नेण्यासाठी अनेक अनधिकृत बस, आॅटो व व्हॅनचालकांनी व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे अनेक व्हॅनमध्ये अनधिकृत गॅसकिट बसविलेली असते. काळीपिवळी स्कूल बसला अधिकृत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. असे असतानाही अनेक वाहनधारकांनी अनधिकृतरित्या विद्यार्थ्यांची ने-आण सुरू केलेली आहे. अशा अनधिकृत वाहनांमुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)स्कूल व्हॅनसाठी हे आहेत नियमवैध गॅस किट असावी.व्हॅन १५ वर्षांपेक्षा अधिक जुनी नसावी.मूळ आसन क्षमतेच्या दीडपट म्हणजे १० अधिक १ असावी.व्हॅनमधील आसनाच्या कुठल्याही बाजूला आधारासाठी हँडलची तरतूद असावी. चालकाचे आसनाचे क्षेत्र स्वतंत्र असावे.सुसज्ज प्रथमोपचार पेटी असावी.आयएसआय मार्क असलेली एबीसी प्रकाराची अग्निशमन उपकरणे असावी.आसनाखाली दप्तरे ठेवण्यासाठी जागा असावी.महापालिकेच्या हद्दीमध्ये व्हॅनची वेगमर्यादा ४० किलो मिटर प्रति तासापेक्षा जास्त असायला नको यासाठी ‘स्पिड गव्हर्नर’ लावणे आवश्यक आहे. व्हॅनला पिवळा रंग आणि शाळेत जाणाऱ्या मुला-मुलीचे चित्र व स्कूल बस हे लिहिलेले असावे आदी नियम आहेत.