शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

धान खरेदी केंद्र सुरु करा

By admin | Updated: November 2, 2015 00:48 IST

चौरास भागातील शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी होऊन मळणी सुरु केली आहे.

शेतकऱ्यांची मागणी : धान उत्पादनात कमालीची घटविरली (बु.) : चौरास भागातील शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी होऊन मळणी सुरु केली आहे. दिवाळी सण समोर येणार असून सण साजरा करण्यासाठी पैशाची गरज राहणार आहे. आधारभूत केंद्र सुरु झाले नाही तर खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने धान विकावे लागणार आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे .सुरुवातीला धान लागवडीचा खर्च अवाढव्य असून यावर्षी शेती तोट्यात आली आहे. शासनाने धान खरेदी केंद्र सुरु केले तर खासगी व्यापाऱ्यांकडून पिळवणूकही थांबेल तसेच काही प्रमाणात दिवाळी सण साजरा करता येईल.विरली बु. येथे आधारभूत धान केंद्र सुरु करण्यासाठी सहकारी संस्थांनी तसेच परिसरातील नागरिकांची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे वाटते.विरली बु. हे लाखांदूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून परिसरातील १२ गावांचा दैनंदिन व्यवहार येथून चालतो. या ठिकाणी भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांच्या शाखा कार्यरत आहेत. याशिवाय दोन सहकारी पतसंस्था आणि भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र सुरु आहे.धान हे या भागातील मुख्य पीक असून सन २०१५ च्या खरीप हंगामामध्ये लाखांदूर तालुक्यात सुमारे २५ हजार हेक्टर या पिकाखाली आहे. परंतु तालुक्यात केवळ तीन संस्थामार्फत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रातून खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान खासगी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावाने विकावे लागतात. या ठिकाणी ५ ते ६ खासगी व्यापारी धान खरेदी करीत असून त्यांच्यामार्फत दरवर्षी सुमारे ५० हजार क्विंटल धान खरेदी केले जाते. विरली बु. येथील विविध सेवा सहकारी संस्थेने आधारभूत शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मान्यता मिळण्यासाठी जिल्हा विपणन अधिकारी भंडारा यांच्याकडे मागणी केली आहे.सध्या मासळ आणि सरांडी बु. या ठिकाणी शासनाची धान खरेदी केंद्रे असून या गावापासून तेथील अंतर सुमारे १० कि.मी. आहे. तसेच या दोन्ही केंद्रावर ३५ ते ४० गावातील शेतकरी आपले धान विक्रीसाठी आणतात. त्यामुळे तेथे धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची सतत गर्दी असते. परिणामी धानाचे वजनमाप करण्यासाठी ३ ते ४ दिवस वाट पाहावी लागते. त्यांच्या माहितीनुसार मागील तीन वर्षापासून महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाची क वर्ग संस्था आहे. संस्थेकडे खरेदी केलेले धान साठविण्यासाठी सध्या २ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता अंदाजे ५ हजार क्विंटल एवढी आहे. सध्या संस्थेकडे २ स्थायी आणि ३ अस्थाये असे एकूण ५ कर्मचारी आहे. संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात संस्थेची उलाढाल १ कोटी १४ लक्ष रुपयाची आहे. (वार्ताहर)