शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
2
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
3
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
4
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
5
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
6
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
7
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
8
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
9
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
10
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
11
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
12
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
13
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
14
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
15
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
16
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
17
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
18
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
19
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
20
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

प्रतीक्षा बघता बघता रात्र झाली

By admin | Updated: July 5, 2014 23:25 IST

सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक यांच्या भव्य सत्काराचा कार्यक्रम मोहाडीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार नाना पटोले येणार होते. त्यांची प्रतीक्षा बघता-बघता रात्र झाली.

सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक सत्कार : खासदार आलेच नाहीमोहाडी : सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक यांच्या भव्य सत्काराचा कार्यक्रम मोहाडीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार नाना पटोले येणार होते. त्यांची प्रतीक्षा बघता-बघता रात्र झाली. पण खासदार आलेच नाही. आठ तासापासून विलंबलेला सत्काराचा कार्यक्रम औपचारिकतेने संपविण्यात आला. तथापि या कार्यक्रमाला उदासिनतेचे ग्रहण लागल्याचे दिसून आले होते.मोहाडीत पहिल्यांदाच शिक्षक संघटना, शिक्षण विभाग यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक खाजगी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्य सत्कार गटशिक्षणाधिकारी माधव फसाटे यांचा होता. बीईओ पदावरुन माधव फसाटे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. या कार्यक्रमाला खासदार यावेत असा आग्रह सभापती वीणा झंझाड यांनी धरला होता.खासदार यावेत म्हणून एक दिवस कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. एका आठवड्यात एवढा मोठा कार्यक्रम शिक्षकांनी आयोजित केला. खासदार म्हणून प्रथमच नाना पटोले येत आहेत याचा आनंद सगळ्यांच्या मनात होता. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक, शिक्षक संघटनेचे नेते, शिक्षक, शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या उत्साहाला सीमा राहिली नव्हती. शिक्षकांसाठी मधुर गीतांचा सुगम संगीत कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. एकूणच कार्यक्रमामध्ये कोणतीही कमी राहू नये याबाबत सर्व काळजी संयोजकांनी घेतली होती. दोन वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. साधारणत: खासदार नाना पटोले ४ वाजता येणार असे सगळ्यांनाच सांगण्यात आले होते. घडीचा काटा पुढे सरकत होता. आता येणार, नंतर येणार असे सहा वाजले. एक-एक करुन शिक्षकांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. सात वाजता अर्ध्यापेक्षा जास्त खुच्या रिकाम्या दिसत होत्या. व्यासपीठावर मात्र खासदार नाना पटोले सोडून इतर निमंत्रित व्यक्ती ठाण मांडून बसली होती. त्यांच्या कपाळावरही उदासीनतेची छटा दिसत होती.. आठ वाजले पण खासदाराचे मोहाडीत आगमन झाले नाही. शेवटी माजी खासदार शिशुपाल पटले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वंदना वंजारी, जि.प.चे उपाध्यक्ष रमेश पारधी यांच्या मुख्य उपस्थितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार आटोपता घेण्यात आला.जनतेचे प्रतिनिधींची व्यस्तता, लोकांची गाऱ्हाणी निपटवता निपटवता लागणारा वेळ, वेगवेगळ्या बैठका यातून सुटता सुटेना अशी अवस्था जनतेच्या प्रतिनिधींची होते. हिच अवस्था नाना पटोलेंच्या बाबतीत झाले. मोहाडीला ते का आले नाही याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने माहिती काढली. दक्षता समितीची बैठक, पुनर्वसन कार्यक्रमाचा आढावा, राईस मिल असोसिएशन संघ कडून सत्काराचा कार्यक्रम, राजस्थानी भवनात असणारा एक कार्यक्रम या सर्व कामांचा निपटारा करता करता खासदार पटोले यांना भंडाऱ्यातून रात्रीपर्यंत निघता आले नाही असे माहीत झाले. त्यामुळे मोहाडीच्या कार्यक्रमाला ते हजर राहू शकले नसल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले. एका मुख्य पाहुण्याच्या अनुपस्थितीमुळे कार्यक्रमात येणाऱ्यांचा, संयोजन करणाऱ्यांचा, सत्कार घेणाऱ्यांचा कसा हिरमोड झाला, कार्यक्रमात कशी उदासिनता पोहचते हे दिसून आले. सात तासापासून चालत आलेला कार्यक्रम निरुत्साहात संपला. पण हजारोंच्या संख्येने उपस्थित झालेल्या शिक्षकांचा व इतरांची एकच प्रतिक्रिया होती, एवढा खर्च केला खासदारांनी किमान अर्धा तास तरी द्यायला पाहिजे होता. आमचा वेळ, पैसा असाच वाया गेल्याची नाराजी शिक्षकांमध्ये दिसून येत होती. पुढच्या वर्षीचा असा कार्यक्रम घ्यायचं का हा विचार करु अशी भावनाही शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली. पहिल्यांदाच उत्साहातला कार्यक्रम हा शेवटचा होणार काय याची चर्चा शिक्षक वर्गही करु लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)