पवनी : ऋषी पंचमीच्या पावन पर्वावर विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या पवनीतील प्रसिद्ध वैजेश्वर घाटावर वैनगंगा नदीत पूर्ण विदर्भातून आलेल्या हजारो महिलांनी पवित्र स्थान करून आपले व्रत सोडले.पवनी शहर हे प्राचीन व ऐतिहासिक आहे. या शहरात पाचीन मंदिराच्या संख्या २०० च्या वर आहे. त्यामुळेच या शहराला मंदिराचे शहर समजल्या जाते. उत्तरप्रदेशातील काशी व पवनीमध्ये बरेच साम्य आहे. काशीनंतर भारतात फक्त पवनी मध्ये १४ गरुड खांब आहे. काशीजवळून गंगा तर पवनीजवळून वैनगंगा नदी वाहते. पवनी वैजेश्वर घाटांची विशेषत: ही आहे की येथे वैनगंगा नदीमध्ये विशिष्ट ठिकाणी बेलाची पाने बुडतात. हिंदू धर्मात मान्यता आहे की जिथे शिवपिंड राहते त्याच ठिकाणी ही बेलाची पाने बुडतात. ऋषीपंचनमीला पूर्ण विदर्भातून रजोनिवृत्त महिला पवित्र स्नान करायला विविध वाहनाने पवनीला येतात. रजस्वला महिलांनी प्रापंचीक, संसारिक, धार्मिक कार्यालयापासून स्वत:ला ४ दिवस अलीप्त ठेवावे असे हिंदू धर्मात मानले जाते. पण गतकाळात महिलांकडून महिलांकडून अज्ञानामुळे चुक झाल्यामुळे आपल्या हातून वाईट घडल्याचे या महिला मानतात. या पापाचे प्रायश्चित करण्याकरिता ऋषी पंचमीला व्रज ठेवतात. जिथे ऋषींचा वास आहे तिथे या महिला स्नान करून पूजा अर्चना करून, देवधानाच्या तांदळाचा भात व अशा ठिकाणची भाजी जिथे बैलांचा पाय लागला नाही.याचे जेवण तयार करून आपले व्रत सोडतात.ऋषीपंचमीला पूर्व विदर्भातील दुरून आलेल्या हजारो महिलांनी वैनगंगा नदीत पवित्र स्थान केल्यानंतर जवळच्याच मंदिरात मोठ्या प्रमाणावर पूजा अर्चना केली. त्यानंतर स्वत: स्वयंपाक करून आपले व्रत सोडले. इतक्या मोठ्या प्रमाणावर पूर्ण विदर्भातून स्थानाकरिता महिला येत असतात. सुदैवाने नदीमध्ये पाणी जास्त असताना कोणतीही दुर्घटना घडली नाही. नगरपरिषदेतर्फे नदीघाटावर येणाऱ्या महिलांकरिता स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती तर ठाणेदार रविंद्र नागरे यांचे मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नदीघाटावर कोणतेही दुर्घटना होऊ नये म्हणून ढिवर बांधव आपल्या नावांसह लक्ष ठेवून होते. ( तालुका प्रतिनिधी)
पवनीत ऋषीपंचमीला हजारो महिलांचे वैनगंगेत पवित्र स्नान
By admin | Updated: August 30, 2014 23:27 IST