शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखली विदर्भ एक्सप्रेस

By admin | Updated: June 25, 2014 23:35 IST

केंद्र शासनाने प्रवासी भाडे १४.२ टक्के व मालभाडे ६.७ टक्के वाढविल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज तुमसर रोड रेल्वे स्थानक व वरठी रेल्वे स्थानकावर रेल्वे

तुमसर / वरठी : केंद्र शासनाने प्रवासी भाडे १४.२ टक्के व मालभाडे ६.७ टक्के वाढविल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज तुमसर रोड रेल्वे स्थानक व वरठी रेल्वे स्थानकावर रेल्वे रोखून आंदोलन केले.रेल्वेच्या दरवाढीच्या विरोधात भंडारा रोड रेल्वे स्थानकावर काँग्रेसच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व आमदार अनिल बावनकर यांनी केले. यावेळी २०० च्यावर कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेवून मुंबई कडून येणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसला रोखून ठेवले होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर झालेल्या पहिल्या अधिवेशनात रेल्वेचे प्रवाशी भाडे, मालवाहतुक सेवा दरात कमालीची वाढ करण्यात आली. आजपासून देशात सर्वत्र ही भाववाढ लागू करण्यात आली. केंद्र सरकारने वाढवलेली दरवाढ ही सर्वसामान्य प्रवाशासह मालवाहतुक सेवेला घातक आहे. यामुळे जनतेचे आर्थिक गणित बिघडणार आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या वतीने दरवाढ मागे घेण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. आज भंडारा रोड रेल्वे स्थानकावर आमदार अनिल बावनकर यांच्या नेतृत्वात रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, बंडूभाऊ सावरबांधे, मोहाडी तालुका अध्यक्ष प्रभु मोहतुरे, एनएसयुआयचे जिल्हा अध्यक्ष मधुश्री गायधने, प्रेमसागर गणवीर, राजकपूर राऊत, अजय गडकरी, अजित गजभिये, राकेश कारेमोरे, राजेश हटवार, वामन थोटे, विजय गजभिये, आनंद तिरपुडे, गंगाधर पंचभाई, कैलास बन्सोड, रवि बोरकर, बाणा सव्वालाखे, तेजस काकडे, देवा वासनिक उपस्थित होते. तुमसर : तुमसर रोड रेल्वे स्थानकावर मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस रोखून रेल्वे रोको आंदोलन केले. तुमसरचे आ.अनिल बावनकर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जिया पटेल, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, मधुकर लिचडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष विठ्ठलराव कहालकर, शहर अध्यक्ष सुरेंद्र पाटील, नगरसेवक प्रमोद तितीरमारे यांच्या नेतृत्वात रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस तुमसर रोड रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक दोन वर सकाळी १०.३० वाजता पोहचली. शेकडो काँग्रेस कार्यकत्योनी विदर्भ एक्सप्रेस समोर येऊन ही गाडी तब्बल १५ मिनिटे रोखून धरली. तुमसर रोड रेल्वे स्थानकाचे अधीक्षक एस.एस. भोईटे यांना काँग्रेस शिष्टमंडळाने रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांच्या नावे निवेदन दिले. यात प्रवासी व मालभाडे वाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. या भाडेवाढीचा तीव्र निषेध नोंदवून जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला.रेल्वे रोको आंदोलनात सीमा भुरे, लक्ष्मी कहालकर, नलीनी डिंकवार, कुसुम कांबळे, सिंधू पडोळे, वैशाली भवसागर, राजेश ठाकुर, राजू गायधने, माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे, प्रेमसागर गणवीर, जितेंद्र बावनकर, सुरेश मेश्राम, आलमखान, चैनलाल मसरके, उपसरपंच शैलेश ठाकरे, राजकुमार राऊत, अ‍ॅड.निलेश सावरबांधे, भाऊदास ठवकर, नामदेव कांबळे, कान्हा बावनकर, यशवंत गायधने, राजकुमार बिरणवारे, अविनाश पिकलमुंडे, बाळा मेश्राम, ममता वासनिक, अंकुश ठवकर, दिनेश भवसागर, नाना चावके, रेखा नगरधने, योगीता बावनकर, चंभरू दमाहे, बिसन ठवकर, सुनिल मेश्राम सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)