लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तीन निष्पाप महिलांचा बळी घेणाऱ्या राजापूर-नाकाडोंगरी मार्गावरील यू-टर्नवरील वाढलेल्या झाडाझुडपांकडे चार दिवसानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तीन महिलांचे बळी गेल्यानंतरही या रस्त्याची अवस्था ‘जैसे-थे’च आहे.तुमसर कटंगी हा आंतरराज्यीय मार्ग क्रमांक ३५५ अतिशय वर्दळीचा आहे. अहोरात्र या मार्गावरून वाहनांची वर्दळ सुरु असते. गुळगुळीत असलेल्या या रस्त्यावरून भरधाव वाहने धावतात. राजापूर ते नाकाडोंगरी दरम्यान मोठे वळण आहे. त्याचा आता यू चा असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठाली झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे वाहनचालकाला समोरून येणारे वाहन दिसत नाही. तेथेच घात होतो. आतापर्यंत या ठिकाणी अनेक अपघात झालेत. अनेकांचे प्राण गेलेत. चार दिवसांपूर्वीच प्रवासी जीप एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळून तीन महिला जागीच ठार झाल्या. तर आठ प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग उपाययोजना करेल अशी नागरिकांना आशा होती. परंतु चार दिवस झाले तरी अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेच काम हाती घेतले नाही. रस्त्यावर झुडुपे वाढली असून ती तात्काळ कापण्याची गरज आहे. तसेच या ठिकाणी अपघातप्रवण स्थळाचा फलक आणि गतीरोधक बांधण्याची गरज आहे. परंतु अपघाताला आमंत्रण देणाºया या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कायम दुर्लक्ष होत आहे. आणखी किती बळी गेल्यावर या रस्त्याची दुरुस्ती करणार असा सवाल नागरिक करीत आहेत.या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पंचायत समिती सदस्य शिशूपाल गौपाले, ठाकचंद मुंगुसमारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले. हा रस्ता अपघातमुक्त करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या राज्य मार्गावरून राजापूर-नाकाडोंगरी यू टर्न आला की वाहन चालकांच्या मनात धडकी भरते. प्रवाशांच्या जीवावर उठलेल्या या यू टर्न वरील झाडे झुडुपे तात्काळ तोडली नाही तर आंदोलनाचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी संबंधित विभागालाही सूचना दिली आहे. परंतु चार दिवसांनंतरही बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे या ठिकाणी स्पष्ट दिसते.राजापूर-नाकाडोंगरी वळण मार्गावरील झुडपे तात्काळ काढण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अपघातानंतरही बांधकाम विभागाला जाग आली नाही. बांधकाम विभागाला पुन्हा अपघाताची प्रतीक्षा आहे काय?-शिशुपाल गौपाले, पंचायत समिती सदस्य, आष्टी.
अपघातानंतरही राजापूर-नाकाडोंगरी रस्ता ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:11 IST
तीन निष्पाप महिलांचा बळी घेणाऱ्या राजापूर-नाकाडोंगरी मार्गावरील यू-टर्नवरील वाढलेल्या झाडाझुडपांकडे चार दिवसानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तीन महिलांचे बळी गेल्यानंतरही या रस्त्याची अवस्था ‘जैसे-थे’च आहे.
अपघातानंतरही राजापूर-नाकाडोंगरी रस्ता ‘जैसे थे’
ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : परिसरातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत