लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रेती वाहतूक करणाऱ्या चार ट्रकला तुमसरच्या पोलीस निरीक्षकांनी चौकशीदरम्यान ताब्यात घेतले. ही कारवाई खापा शिवारातील वजनमाप केंद्राजवळ करण्यात आली. ओव्हरलोड अथवा अवैध वाहतूक होती काय या संदर्भात ट्रक ताब्यात घेण्यात आले असून महसूल विभागाकडून अहवाल आल्यावर कारवाईची दिशा ठरणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.खापा शिवारात वजनमाप केंद्राजवळ ट्रक क्रमांक एमएच ४० बीजी ४५५०, एमएच ३६ एए ९४४, एमएच ४० एके २५९७, एमएच ४० वाय ९५७० तुमसरच्या पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांना दिसले. त्यांनी चौकशी केली तेव्हा संशय आला. चारही ट्रक ताब्यात घेऊन तुमसर ठाण्यात आले.तुमसर पोलिसांनी ट्रकबाबत महसूल विभागाला माहिती दिली. सदर ट्रक वाहतूक करणाºया चालकांजवळ मध्यप्रदेशांतील टिपी आढळली. या टिपीची चौकशी बालाघाट येथील खनीकर्म विभाग आणि वनविभागाकडे दिली आहे. चौकशीअंती नेमकी कोणती कारवाई करायची याची दिशा ठरविली जाणार आहे. सध्या तुमसर तालुक्यातील रेतीघाट बंद आहेत. त्यामुळे कंत्राटदारांनी आपला मोर्चा मध्यप्रदेशाकडे वळविला आहे. परंतु रेती तुमसर तालुक्यातील असते. टिपी मात्र मध्यप्रदेशातील असते.
रेती वाहतुकीचे चार ट्रक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:18 IST
रेती वाहतूक करणाऱ्या चार ट्रकला तुमसरच्या पोलीस निरीक्षकांनी चौकशीदरम्यान ताब्यात घेतले. ही कारवाई खापा शिवारातील वजनमाप केंद्राजवळ करण्यात आली.
रेती वाहतुकीचे चार ट्रक ताब्यात
ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : खापा शिवारातील प्रकार