बदलीची मागणी : पोलीस अधीक्षकांना सह्यांचे निवेदनजवाहरनगर : राष्ट्रीय महामार्ग ठाणा (पे.पंप) टी पॉइंट येथे तैनात असलेल् या एका वाहतूक पोलिसाच्या दबंगशाहीने येथील प्रवाशी व वाहनधारकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर वाहतूक पोलिसाची बदली करण्याची ठाणा येथील ५६ ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या देण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ठाणा पे.पंप हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. येथे टी पॉइंट स्थित नागपूर व भंडाऱ्याकडे जाणारे येणारा प्रवासी असतात. येथे प्रवासी निवारा नाही. प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागते. पाऊस आले की समोरील उड्डाणपुलाखाली आश्रय घ्यावे लागते. प्रवासी, शाळकरी, शेतकरी, ग्रामस्थ आपल्या दुचाकीने ये जा करण्यासाठी वापर करीत असतात. विसावा म्हणून दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली जाते. मात्र येथील कार्यरत वाहतूक पोलीस आपल्या शासन मान्यता नसलेल्या दंडुकशाहीचा धाक दाखवित दुचाकी स्वारांना त्रास देत असल्याचे कळते. ‘ठाणेदार साहेबांना पैसे द्यावयाचे आहे’ असे म्हणून पैशाची मागणी करीत असतो, असे नागरिकांचा आरोप आहे. मागणी पूर्ण न झाल्यास शिवीगाळ, धक्काबुक्की करीत १२२ अन्वये कारवाई करण्याची धमकी दिली जाते. तसेच टी पॉर्इंटवर अवैध व्वयसाय करणाऱ्या व्यक्तीला वाहनावर घेऊन परिसरात फिरत असल्याचेही नागरीकांचा अकरोप आहे. ठाणा येथील नवीन उड्डाणपुलाच्या दोन्ही टोकावर रेती ट्रकांना अडवून पैशांची मागणी केली जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यावेळीही पावती दिली जात नाही. संबंधित वाहतूक पोलिसांवर योग्य कारवाई करून त्या पोलीस कर्मचाऱ्याची बदली करण्यात यावी. या आशयाचे निवेदन ५६ ग्रामस्थांच्या स्वाक्षरीनिशी आज शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. यापूर्वी दबंगशाहीने वागणाऱ्या या पोलीसदादाचे कारनामे चर्चेत राहिले आहे. त्यामुळे या वाहतुक पोलीसावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
पोलीसदादाची ‘दंडूकेशाही’
By admin | Updated: September 6, 2014 23:32 IST