शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लोकमत’च्या सोहळ्यातील सहभागाने भारावलो

By admin | Updated: June 26, 2016 00:58 IST

‘लोकमत’ने पुणे येथे आयोजित केलेल्या ‘एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमातील सहभागाने आपण भारावून गेलो.

ब्रह्मानंद करंजेकर यांनी केले अनुभव कथन : एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्रचे पुण्यात लोकार्पणभंडारा : ‘लोकमत’ने पुणे येथे आयोजित केलेल्या ‘एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमातील सहभागाने आपण भारावून गेलो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांवर चर्चा झाली. त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, अशा अपेक्षा वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ.ब्रह्मानंद करंजेकर व संस्थेच्या सचिव डॉ. वृंदा करंजेकर यांनी व्यक्त केल्या. डॉ.करंजेकर यांच्या वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेंतर्गत वैनगंगा कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट नागपूर, संताजी आर्टस, सायन्स कॉलेज पालांदूर ता.लाखनी, कामाई करंजेकर विद्यालय एकोडी ता.साकोली, एन.पी. सिंह शारीरीक शिक्षण महाविद्यालय साकोली, राजीव गांधी महाविद्यालय सडक अर्जुनी, राजीव गांधी शिक्षण महाविद्यालय सडकअर्जुनी, ताराचंद निखाडे अध्यापक विद्यालय साकोली, बाजीरावजी करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसी साकोली, डॉ.एस राधाकृष्णन कॉलेज आॅफ एज्युकेशन साकोली, नवजीवन कॉन्व्हेंट अ‍ॅण्ड प्रायमरी स्कूल जमनापूर साकोली असे या संस्थेच्या १७ शाळा आणि महाविद्यालय आहे. या संस्थेतील शाळांमधून सुमारे १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून ६५० हून अधिक शिक्षक व प्राध्यापक या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे संचालित वैनगंगा कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची पहिली पसंत ठरली आहे. हे कॉलेज गुमगाव रेल्वे स्थानक वर्धा रोड येथे आहे. कॉलेजची सुरूवात २००८ मध्ये झाली. डॉ.ब्रम्हानंद करंजेकर यांनी आठ वर्षांत कठोर परिश्रम आणि सर्मपणाने इंजिनिअरिंग कॉलेजचा अत्याधुनिक सुसज्ज कॅम्पस, सुसज्ज वर्गखोल्या, अत्याधुनिक लॅब, उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षकांचा समूह, विभिन्न खेळांसाठी सुविधा, इंडस्ट्रीज अनुरूप अभ्यासक्रमाला विकसित करण्यासह विद्यार्थ्यांना सक्षम करण्यात वैनगंगा कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट यशस्वी ठरले आहे. या कॉलेजमध्ये बीई मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, काम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग, इन्फारमेशन टेक्नालॉजी (आयटी), इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अण्ड टेलिकॉम आदी अभ्यासक्रम आहेत. एम.टेक.मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग, सॉफ्टवेअर सिस्टिम, इन्टिग्रेटेड पॉवर सिस्टिम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड पॉवर सिस्टिम, कॅड व कॅम आदी अभ्यासक्रम आहेत. पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल, ईलेक्ट्रीकल, सिव्हील, कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग आणि एमबीए अभ्यासक्रम आहेत. या कॉलेजची यशस्वीता त्याचा निकाल आणि जॉब प्लेसमेंटमध्ये दिसून येते. निरंतर ८० टक्के निकाल आणि २५० विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये झालेली निवड, ही कॉलेजची उच्च गुणवत्ता दर्शविते. डॉ. ब्रह्मानंद करंजेकर यांच्या पत्नी डॉ.वृंदा करंजेकर या संस्थेच्या सचिव आहेत. ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी मोलाची गोष्ट असल्याचे डॉ. ब्रह्मानंद करंजेकर यांनी सांगितले. ‘एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमाबाबत त्यांना काय वाटले, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी कार्यक्रमाच्या सादरीकरणाचे कौतुक केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या समक्ष शैक्षणिक क्षेत्रातील समस्या आणि उणिवांवर चर्चा करण्यात आली. केवळ सत्कार आणि सन्मानाचा हा कार्यक्रम नव्हता तर येथे विदर्भात शैक्षणिक कार्य करणाऱ्या खासगी संस्था संचालकांना समस्या मांडता आल्या. खासगी शाळा व महाविद्यालयांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन ना.विनोद तावडे यांनी दिल्याचे डॉ.करंजेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात होतकरू विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र या शिष्यवृत्ती वाटपात शासनाकडून अनियमितता होत आहे. याबाबीकडे शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. दोन वर्षांपासून राज्य शासनाने शिष्यवृत्तीचे पैसे दिले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असे या कार्यक्रमात संस्थाचालकांनी सांगितल्याची माहिती डॉ.करंजेकर यांनी दिली. ‘लोकमत’ समुहाचे चेअरमन खासदार विजय दर्डा आणि एडीटर ईन चीफ राजेंद्र दर्डा यांनीही विदर्भातील खासगी शिक्षण संस्थेच्या समस्या ऐकून घेतल्या, त्या सुटाव्यात, अशी अपेक्षा डॉ. ब्रह्मानंद करंजेकर आणि डॉ.वृंदा करंजेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. (स्थानिक प्रतिनिधी)