शेती पाण्याअभावी : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकटगोसे (बुज.) : गोसीखुर्द धरण परिसरातील गोसीखुर्द, गोसे बुज, मेंढा, वासेळा आदी गावातील या वर्षी एका पावसामुळे धानाचे पीक होऊ शकले नाही. लहान, मोठ्या सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. छोट्या मोठ्या सर्वच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी खायला एक दानाही न झाल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती मोठी बिकट व दयनीय झाली आहे.ज्या गावाजवळ विदर्भातील सर्वात मोठी राष्ट्रीय गोसीखुर्द धरण तयार होऊन मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला आहे त्या गोसीखुर्द गावालाच सिंचनापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे अंतिम टप्प्यात पाऊस न पडल्याने या गावातील ७० ते ७५ टक्के धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.गोसीखुर्द गावातील रमेश भेंडारकर यांची ६ एकरातील देवा झंझाड यांचे ८ एकरातील संजय भोयर यांचे ८ एकरातील श्रीकृष्ण भोयर यांचे ८ एकरातील, माजी सरपंच रामचंद्र मेश्राम यांचे २ एकरातील बाळकृष्ण रोडगे यांचे दीड एकरातील पांडूरंग मेश्राम यांचे २ एकरातील, मारोती हत्तीमारे यांचे अडीच एकरातील, दिगांबर सूर्यवंशी यांचे चार एकरातील, रायभान मेश्राम यांचे तीन एकरातील या शेतकऱ्यांसह अनेक शेतकऱ्यांचे धानाचे पिक एका पावसाने गेले असल्याने मोठे नुकसान झाले आहे.गोसे (बु.) येथील सुधाकर ठाकरे यांचे तीन एकरातील चैनराव माटे यांचे दोन एकरातील, अनिल वानखेडे यांचे चार एकरातील, रामा घोरमाडे, दामू घोरमोडे, श्रीहरी घोरमोडे यांचे आठ एकरातील आदी शेतकऱ्यांसह अनेक शेतकऱ्यांचे धानाचे पीक एका पावसाने गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. मेंढा येथील दादा आगरे, आनंदराव मेश्राम, मधुकर आगरे, रामकृष्ण कांबळे, भैय्या आगरे, भागरथा चन्ने, शांता वांढरे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे धानाचे पीक एक पावसाने गेले आहे. या शेतकऱ्याच्या शेतातील धानाच्या पिकांचे रुपांतर तणसीत झाले आहे.या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन या शेतकऱ्यांची स् िथती कमालीची बिकट झाली आहे. या शेतकऱ्यांना यावर्षी तांदळाचा एक दाणाही खायला झाला नाही. या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. (वार्ताहर)
हातात आलेले धानपीक गेले वाया
By admin | Updated: November 18, 2014 22:49 IST