प्रकरण मग्रारोहयोचे : आलेसूर येथील प्रकार, माहिती अधिकारात माहिती देण्यासाठी टाळाटाळतुमसर : ‘रोजगार हमी, अर्धे तुम्ही अन् अर्धे आम्ही’ असा काहीसा प्रकार आदिवासीबहुल आलेसूर या गावात सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गावातील बाहेरगावी गेलेल्या तरुणांची नावे मस्टरवर आहेत. गावातील सधन व्यक्तींची नावेसुद्धा मस्टरवर असून ते एकही दिवस कामावर गेले नाहीत. येथे २00 पैकी ४0 ते ५0 मजुरांची बोगस नावे असल्याची धक्कादायक माहिती आहे. नियमित कामावर जाणार्यांना येथे ४0 ते ६0 रुपये मजुरी मिळते. याउलट जे कामावर जात नाहीत त्यांना दुप्पट मजुरी मिळत आहे. माहिती अधिकारात दोनवेळा माहिती मागितल्यानंतरही माहिती देण्यात आलेली नाही. आदिवासीबहुल आलेसूर या गावात खडीकरणाचे काम सुरु आहे. हा परिसर जंगलाला लागून आहे. येथे २१0 मजूर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मस्टर असून गावातील सधन व्यक्तींचे नावे या कामावर दाखविण्या आले आहेत. ते एकही दिवस कामावर आले नाहीत. मस्टरवर त्यांची नावे नियमितपणे सुरु असून कामावर असलेल्या मजुरांपेक्षा त्यांना जास्त मजुरी मिळत आहे. जे नियमित कामावर आहेत त्यांना मात्र ५0 ते ६0 रुपये मजुरी मिळते. जेवढे काम तेवढे दाम या योजनेत आहे. दि.११ मार्चपासून येथे मग्रारोहयोची येथे कामे सुरु आहेत. यासंदर्भात येथील मजुरांनी दि. १९ मे व २६ मे रोजी तुमसर पंचायत समिती कक्ष अधिकार्यांजवळ माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली. परंतु अजूनपर्यंत माहिती देण्यात आलेली नाही. दि. २९ मे रोजी पंचायत समिती कार्यालयातील कक्ष अधिकार्यांना भेटले असता नंतर या असे त्यांनी बजावल्याचे मजुरांनी सांगितले. त्यानंतर हिरमुसलेले हे मजूर घराकडे परतले. (तालुका प्रतिनिधी)
गावात नसणार्यांची नावे ‘मस्टरवर’
By admin | Updated: May 30, 2014 23:26 IST