साकोली : बऱ्याच वर्षापासून साकोली ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतीत होईल या अपेक्षेने साकोलीवासीयांचे डोळे पाणावले असून लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे साकोली नगरपंचायत होणार. त्या आशेवर आता साकोलीवासीयांची नजर असून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनातर्फे नगरपंचायतीची घोषणा होण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे.साकोली ग्रामपंचायती ही १९३२ साली स्थापन करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील जुनी व वर्षाकाठी लाखो रुपयाचे उत्पन्न घरकरातून देणारी ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक आहे. साकोली येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालय अशा विविध सोयी सुविधांनी सज्ज आहे.दिवसेंदिवस साकोलीची लोकसंख्या वाढत असून आज घडीला साकोलीची लोकसंख्या वीज हजाराइतकी नक्कीच आहे. त्यामुळे गावातील विकासाच्या दृष्टीने साकोली ग्रामपंचायतीचे रुपांतर आता नगरपंचायतमध्ये होणे गरजेचे आहे. याच आधारावर राज्य शासनाने राज्यातील जवळपास १२८ तालुकास्तरीय ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करण्याची घोषणा केली होती. त्यात साकोली ग्रामपंचायतचेही नाव होते. या घोषणेप्रमाणे शासनस्तरावरून आवश्यक प्रक्रीया करण्यात आली असून साकोली ग्रामपंचायतीमध्ये जाहीरनामाही काढण्यात आला होता. प्रक्रिया करण्यात आली असून साकोली ग्रामपंचायतमध्ये जाहीरनामाही काढण्यात आला होता. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नगरपंचायतीची घोषणा होऊ शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (तालुका प्रतिनिधी)
साकोलीवासीयांच्या नजरा नगरपंचायतीकडे
By admin | Updated: August 27, 2014 23:18 IST