पालांदूर : पाऊस येणे थांबणे, उन येणे यामुळे हवामान अळीकरीता पोषक असल्याने पालांदूर परिसरात लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवला आहे. सोबतच पाने गुंडाळणारी अळी, खोडकिडी, साधा करपा, कडा करपा आदींच्या प्रवावाने धान पिक धोक्यात आले आहे. उष्ण दमट हवामानामुळे किडीचे प्रस्थ वाढत जात आहे. लष्करी अळी नियंत्रणाकरिता प्राथमिक उपायात बांधात पाणी भरणे आवश्यक आहे. शक्य नसल्यास बांधाच्या शिवेवर भातखाचरावर प्रति एकर १५ किलो कुक्कूस, २ किलो गुळ, अर्धा किलो मोनोक्रोटोफॉस व्यवस्थिती मिळवून फेकावे. प्रादुर्भाव अधिक असल्यास रासायनिक किटकनाशकात कोर्रेजन हल्ली डायक्लोम्हास ३० मि.ली., हेमॉमैथीन बेनझाईड ६ ग्रॅम, इंडोक्लाम कार्ब फ्रिडम १० किलो १५ लीटर पाण्यात मिसळवून फवारणी करण्याचे आवाहन जिल्हा आत्मा समितीचे सदस्य सुधीर धकाते यांनी केले.लष्करी अळी दिवसा कमी व रात्रीला जोरदार हल्ला चढवून पिक फस्त करीत जाते. लष्करी अळी हिरवी, गेरव्या, काळ्याकरपट रंगाची आहे. तिच्या पाठीच्या दोन्ही बाजुला केस उभे असतात. दिवसा ही अळी धानाच्या बुंध्यात लपून बसतो. सहसा ही अळी दिसत नाही. रात्रीला लष्कराच्या चालीने हल्ला चढवितो, असे पालांदूर मंडळ कृषी अधिकारी अरुण रामटेके यांनी सांगितले.अनुदानावर कीटकनाशक पुरवामहागाईने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अस्मानी सुलतानी संकटाने बेजार शेतकरी खाली हाताने असल्याने किड नियंत्रणाकरिता अनुदानावर कीटकनाशक पुरविण्याची कळकळीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शरीबाचा शेवटचा कालावधी सुरू असून एकही वेळ कीटकनाशक कृषी मंडळ कार्यालयात आलेली नाही. केवळ तालुक्याला पंचायत समितीत कीटकनाशक पुरविण्यात आले. तेही अत्यल्पच शेतकऱ्यांना मिळाले हे न्याय, नितीला धरून नाही. तेव्हा सरसकट सर्वच शेतकऱ्यांना अनुदानावर किटकनाशक पुरविण्याची मागणी पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
धानपिकावर लष्करी अळीचे आक्रमण
By admin | Updated: September 9, 2014 23:15 IST