मंत्र्यांना निवेदन : आदिवासी आघाडी पदाधिकाऱ्यांनी केली मागणीतुमसर : तुमसर तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थी असुरक्षिततेच्या सावटात शिक्षण घेत असून शाळेतील निवास व्यवस्था अतिशय दयनीय आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आदिवासी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्र्यांकडे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.आश्रमशाळेतील स्थिती भयावह आहे. यापूर्वी शासन व प्रशासनाने कारवाई केली नाही. जिल्ह्यात तुमसर तालुक्यात शासकीय आश्रमशाळा एकच आहे. इतर चार खाजगी आश्रमशाळत्त आहेत. शासकीय आश्रमशाळा व खाजगी अनुदानित शाळेत शासन निर्णयानुसार सुविधेचाअभावी आतापर्यंत काही विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला.आजही आश्रमशाळेत विद्याथीृ खाली जमिनीवर झोपत आहे. सर्पदंशाने येथे विद्यार्थ्यांचा जीव जात आहे. यासर्व शाळा जंगलाच्या व गावाच्या बाहेर आहेत. शौचालय व स्रानगृहाच्या समस्या आहे. शाळा परिसरात दुर्गंधी येते. शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या आश्रमशाळाबद्दल शासन व प्रशासनाला माहिती देण्यात आली, परंतु कारवाई शुन्य आहे. तुमसर तालुक्यातील पवनारखारी आश्रमशाळेत आजपावेतो सहा विद्यार्थी मृत्युमूखी पडले, परंतु शाळा प्रशासनावर कारवाई झाली नाही. अजून किती विद्यार्थ्यांचा बळी जाणार हा प्रश्न येथे आहे. आदिवासीच्या हितापेक्षा शाळा संचालकाच्या हिताकरिता आश्रमशाळा सुरू आहेत काय, अशा आश्रमशाळेवर शासन कां निर्णय घेत नाही. शासनाच्या निधीचा दुरूपयोग करून आदिवासी विद्यार्थ्यांचे सर्रास शोषन सुरू आहे. अनेक आश्रमशाळेचे शिक्षक, शाळा परिसरात व गावात राहत नाही. शहरात राहून शाळांचा कारभार सुरू आहे. येथे मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानी नियम धाब्यावर बसणे सुरू आहे. यासर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करण्याीच मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिष्टमंडळात आदिवासी विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनेश मरस्कोल्हे, अशोक उईके, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, विकास मरस्कोल्हे, संजय गजाम, नरेंद्र मडावी, राजू धुर्वे, सुभाष धुर्वे, घनश्याम मरस्कोल्हे, संजय मरस्कोल्हे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
'त्या' आश्रमशाळांची चौकशी करा
By admin | Updated: July 27, 2016 00:45 IST