शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कूलरला महागाईच्या झळा

By admin | Updated: March 27, 2015 00:15 IST

मध्यंतरी पावसामुळे वातावरणात गारवा आल्यानंतर कूलर उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. परंतु, वाढत्या तापमानामुळे विक्रेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

भंडारा : मध्यंतरी पावसामुळे वातावरणात गारवा आल्यानंतर कूलर उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. परंतु, वाढत्या तापमानामुळे विक्रेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. कूलरचे पंप, मोटर, लोखंडी पत्रा आणि वूडवूलच्या किमती वाढले आहे. त्यामुळे यावर्षी कुलरच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाल्याची माहिती उत्पादक अभय भागवत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.वाढत्या तापमानात घराला थंडावा देण्यासाठी ‘कूलर’ हवाहवासा वाटतो, पण या वर्षी त्याच्याही किमती गरम झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ जाणवत आहे. महागाईची झळ सोसून उकाड्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी नागरिकांचा कुलर खरेदीकडे कल वाढला आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या डेझर्ट कूलरसह नामांकित ‘ब्रँडेड’चे नवे कूलरही बाजारात दाखल झाले आहेत.

पावसामुळे विक्रीला उशीरजानेवारीच्या अंतिम सप्ताहापासून कुलरचा व्यवसाय सुरू व्हायचा. पण यंदा त्याचा मुहूर्त मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात निघाला. पावसामुळे कुलर बाजारावर आलेले मंदीचे सावट अखेर दूर झाले आहे. सध्या कुलरच्या विक्रीला जोर चढला आहे. आठवड्यात वाढत्या उन्हामुळे विक्रीत वाढ झाली असली तरीही यावर्षी उशिरा सुरू झालेल्या सिझनमुळे उत्पादकांवर व्याजाचा बोझा वाढला आहे. यावर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, पण तुलनेत विक्री उशिरा सुरू झाल्याने हवी तशी किंमत मिळत नाही. विदर्भातील सर्वात मोठ्या महात्मा फुले बाजारपेठेत खरेदीदारांची गर्दी दिसून आली. पावसामुळे आलेली मरगळ आता दूर झाल्याने व्यापारी खूश आहेत. होळीनंतर मागणीत वाढहोळीनंतर तापमानात वाढ झाल्याने उकाडा जाणवू लागला आहे. सायंकाळी गारवा, तर दुपारी उन्हाचे चटके बसू लागले आहेत. या वाढलेल्या तापमानामुळे दुपारी शहरातील रस्ते काहीसे मोकळे होताना दिसत आहेत. सध्या तापमानाने चाळीशी पार केली आहे. सध्या कुलर आणि एअरकंडिशनची मागणी वाढली आहे.डेझर्ट व प्लास्टिक कूलरला मागणीवाढत्या उन्हामुळे डेझर्ट कुलरला मागणी असते. खिडकीच्या आकारानुसार किंवा घरात ठेवण्यासाठी अगदी दोन फुटांपासून साडेचार फूट आकारात कुलर आहेत. ‘डेझर्ट’सोबत अनेक नामांकित कंपन्यांचे प्लास्टिकचे कूलर बाजारात आहेत. यासह रूम एसी, विन्डो एसी, टेबल व विन्डो कूलरदेखील उपलब्ध आहेत. कंपन्यांचे कूलर ४ ते १५ हजारापर्यंत ‘डेझर्ट’ची किंमत त्याचा आकार व त्यातील मोटारीनुसार आहे. प्लास्टिकचे कूलर बरेच वर्ष खराब होत नाहीत. याशिवाय विजेचा शॉक लागण्याचीही भीती नसते. त्यामुळे मोठे कूलर उत्पादक प्लास्टिकचा उपयोग मोठ्या प्रमाणात करीत आहे. महागड्या कूलरचे ग्राहक वेगळेमहागडे कुलर खरेदी करणारा ग्राहकवर्ग वेगळा आहे. स्थानिक पातळीवर तयार होणारे कुलर अवघ्या तीन ते साडेतीन हजार रुपयापर्यंत मिळू लागल्यामुळे त्याची खरेदी जोरात सुरु आहे. फार पूर्वी कुलरची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होती. मात्र व्यावसायिक स्पर्धेत नामांकित कंपन्यांनी आपल्या उत्पादनाची किंमत कमी केली आहे. विशेष म्हणजे आता ग्राहकांच्या खिशात पैसा नसतानाही तो हव्या त्या वस्तूची खरेदी करू शकतो. कूलरसारख्या वस्तूही कर्जावर मिळू लागलेल्या आहेत. एसीकडे ग्राहकांचा ओढावातानुकूलित यंत्र सर्वसामान्यांना बसविणे आता अवघड आहे, असे म्हणणे आता चुकीचे ठरेल. सामान्यही ब्रॅण्डेड कंपनीचा एसी खरेदी करीत आहे. उन्हाळ्यात थोडे जास्त विजेचे बिल भरण्याची त्यांची तयारी आहे. १५ हजार रुपयापासून ते लाखापर्यंत एसी बाजारात उपलब्ध आहे. खरेदीसाठी सवलतीच्या योजना विविध नामांकित कंपन्यांच्या एअर कुलरवर सवलतीच्या योजना आहे. प्रथमच रिमोट बेस तसेच आयोनायझर, ह्युमिडीटीफायर व स्लिपमोड अशा वैशिष्ट्यांमुळे काही मिनिटातच थंड गारवा जाणवणारे कुलर बाजारात आहेत. शरीरास पोषक असणारी आयोनायझेशनच्या हवेमुळे सर्दी, डोकेदुखीचा त्रास होत नाही. आयएसआय मार्कची उपेक्षानियमानुसार उत्पादनात आयएसआय मार्कची उपकरणे असणे आवश्यक आहे. वायर, पंप, मोटर आदी वस्तूच्या दर्जाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कूलर सुरू असताना शॉक लागून जीवहानी झाल्याचा घटना घडल्या आहेत. शासकीय यंत्रणा बीआयएसचे याकडे दुर्लक्ष आहे. शासकीय मानकाच्या वस्तू लावल्यास कूलरच्या किमतीत वाढ होईल आणि त्याचा विक्रीवर परिणाम होईल, असे उत्पादकांचे मत आहे.