लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातील नवनवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे, कृषी विभागातील कर्मचाºयांनी शेतकºयांच्या अडचणी सोडविण्याकरिता प्रयत्न करावे, असे आवाहन आमदार बाळा काशिवार यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे आयोजित धान महोत्सव, शिवार फेरी, शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन व चर्चासत्र कार्यक्रमात ते बोलत होते.कृषी विज्ञान केंद्र साकोली, कृषी व्यवस्थापन यंत्रणा भंडारा, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प साकोली, कोरोमंडळ फर्टीलायझर्स ग्रुप भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, कृषी भूषण शेतकरी शेषराव निखाडे, रामचंद्र कापगते, डॉ. जी.आर. श्यामकुवर, कवळू शांतलवार, मिलींद लाड, वंदना शिंदे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी हिंदूराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील धान पिकावरील तुडतुडा नियंत्रणाकरीता प्रभावी तंत्रज्ञान उपलब्धतेकरीता कृषि विज्ञान केंद्र आणि कृषी संशोधन केंद्र साकोली यांचा मोलाचा वाटा असून, शेतकऱ्यांनी धान शेतीमध्ये यांत्रिकीकरण गरज, धान पेरणी यंत्र, रीपरची काढणीकरीता वापर, पीक पद्धतीमध्ये बदलाची गरज यावर मार्गदर्शन करून शेतकºयांनी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी सुसंवाद साधून तंत्रज्ञानाच्या जोडीने उत्पन्न वाढवून आपला विकास साधण्याचे आवाहन केले.डॉ. जी.आर. श्यामकुवर यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विकसीत धानाच्या विविध जाती व त्यांचे गुणधर्म याविषयी माहिती दिली. रब्बी हंगामातील पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर डॉ. निलेश वझिरे, कृषी क्षेत्रात विविध मोबाईल अॅप्सचा वापर या विषयावर प्रमोद पर्वते, औजारे वापर व महत्व या विषयावर योगेश महल्ले, कांदा पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर सूचित लाकडे, जनावरांचा पशुखाद्यावरील खर्चात बचतीचे मार्ग या विषयावर डॉ. प्रवीण खिरारी यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमात धान पिकाचे विविध ५५-६० जाती, वाण, प्रक्षेत्रावर शेतात उभा मशिनने पेरलेला आवत्या धान, विविध औजारे, आवत्या पेरणी मशिन, धानातील पेट्रोलवर चालणारे यंत्र, विविध तंत्रज्ञान, जनावरांचा पोषक चारा, शेळीच्या विविध जाती, कोंबडीच्या विविध जाती, धान पीक लागवडीच्या विविध पद्धती, कृषी प्रदर्शनामध्ये विविध शासकीय, अशासकीय विभागांचे तंत्रज्ञान माहिती दालन, बचत गटांचे दालन, विविध कंपनीचे दालनच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. कृषी कार्यानुभव विद्यार्थी, कृषी महाविद्यालय नागपूर यांनी यावेळी तुडतुडा नियंत्रण, कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी आणि प्लास्टीक निर्मूलन या विषयावर पथनाट्य सादर केले. संचालन प्रमोद पर्वते यांनी तर, आभार सूचित लाकडे यांनी केले.
खर्च कमी करून उत्पादन वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:06 IST
शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातील नवनवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे, कृषी विभागातील कर्मचाºयांनी शेतकºयांच्या अडचणी सोडविण्याकरिता प्रयत्न करावे, असे आवाहन आमदार बाळा काशिवार यांनी केले.
खर्च कमी करून उत्पादन वाढवा
ठळक मुद्देबाळा काशिवार : साकोलीत धान महोत्सव, शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन व चर्चासत्र