शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

२८ हजार जनावरांचे लसीकरण वांद्यात

By admin | Updated: May 29, 2014 01:57 IST

जिल्हा परिषद उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती यांचे गृहक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिहोरा ..

जिल्हा

परिषद उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती यांचे गृहक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिहोरा परिसरात पशु वैद्यकीय सेवा आजारी आहे. इमारतीचा अभाव, रिक्त पदांचा अनुशेषामुळे जनावरांचे लसीकरण अडचणीत आले आहे. चुल्हाड पशुचिकीत्सालयाला आठ दिवस सातत्याने भेट दिली असता ते बंद स्थितीत दिसून आले.

सिहोरा

परिसरात रोजगार तथा रोजगारांची साधने नसल्याने शेतकरी व त्यांचे कुटूंब शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. या शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर केल्या जात आहे. गावांगावात पशुधनाची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने १८ कि.मी. अंतरावर चार पशु दवाखान्याला मंजुरी दिली आहे. परंतु पशु वैद्यकीय सेवा खुद्द आजारी दिसून येत आहे.

ऐन

पावसाळ्यात परिसरात दलदल असताना जनावरे अनेक आजारांना बळी पडतात. पावसाळ्य़ात वैनगंगा आणि बावनथडी नद्यांना पुर येतो. या पुराचे पाणी शेत शिवार आणि गावात शिरत असल्याने जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्न निर्माण होत असतो. पुरांचे पाणी ओसरताच अनेक आजारांचा प्रसार होतो. हिरव्या चार्‍याने जनावरांना आजार होतात. तत्पूर्वी लसीकरणाची गरज आहे. परंतु प्रशासन गंभीर नाही.

जिल्हा

परिषद उपाध्यक्षाच्या प्रयत्नाने बपेर्‍यात श्रेणी-१ चा पशु दवाखाना मंजुर झालेला आहे. या दवाखान्याचे इमारत अभावी लचके तोडण्यात येत आहे. सध्या स्थित पशु दवाखाना गावातील समाज मंदिरात सुरू आहे. या समाज मंदिरात एकही सोय नाही. पशु वैद्यकीय अधिकारी ही मस्त झाली आहे. या पशु दवाखान्याला आजवर चांगले दिसत आले नाही. कधी येतील याचा नेम नाही. मध्यंतरी या पशु दवाखाना इमारत बांधकामाची अडचण निकाली काढण्यात आल्याची चर्चा होती. ही चर्चा हवेतच विरली.

पशु

दवाखान्याला जागा मिळाली नसल्याने ग्रामपंचायतच्या व्यापारी संकुलात तंबु ताणले आहे. व्यापारी संकुलनात पशु दवाखाना असा नवा पॅटर्न राबविण्यात येतो की काय, असा प्रश्न आपसुकच निर्माण होत आहे. या दवाखान्यात तब्बल आठवडा भर भेट दिली असता कुलूपबंद दिसून आले आहे. या पशु दवाखान्यात सारेच पद रिक्त आहे. नाममात्र फलक आहे. हा पशु दवाखाना राज्यस्तरीय असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा

परिषद आणि राज्य शासन ही दोन्ही यंत्रणा जनतेच्या हिताकरिता कार्य करीत आहे. दोन्ही विभागात लोकप्रतिनिधी आहेत. परंतु समस्या निकाली काढताना एकमेकांकडे बोट दाखविण्यात येत आहे. त्यामुळे चुल्हाड परिसरात पशुधनाचे लसीकरण अडचणीत येणार आहेत.

सिहोर्‍यात

श्रेणी-१ चा पशु दवाखाना कार्यरत आहे. या दवाखान्यात पशु वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचार्‍यांचा ताफा आहे. जनावरांना लसीकरण होत आहे. या पशु दवाखान्याची तक्रार नाही. नजिकच नवीनतथा सुसज्ज इमारत बांधकाम करण्यात आले आहे. ही इमारत जिल्हा परिषदेमार्फत उभी करण्यात आली. नऊ वर्षापासून या इमारतीचा शुभारंभ अडला आहे. हरदोली गावात पशु वैद्यकीय सेवा जीर्ण इमारतीत दिल्या जात आहे. इमारत जीर्ण झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी नव्या घरात बस्तान मांडले आहे. परंतु याच इमारतीच्या दुसर्‍या खोलीत नाईलाजास्तव पशु वैद्यकीय अधिकारी सेवा देत आहे. नवीन इमारतीचा अनुशेष आहे.

सिहोरा

परिसरात जवळपास २८ हजार जनावरांचे लसीकरण अडचणीत आले आहे. जनावरांना होणार्‍या विविध आजारांचे लसीकरण सुविधेअभावी डोकेदुखी वाढविणारी आहे.