शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

वृक्षतोडीच्या घटनांमध्ये वाढ

By admin | Updated: March 14, 2016 00:26 IST

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती हे संत तुकारामांचे शब्द वृक्षतोडीने नि:शब्द बनून पक्ष्यांची स्वरे दुर्मिळ होत आहेत.

वनविभाग सुस्त, तस्कर मस्तपर्यावरणासाठी धोक्याची घंटाभंडारा : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती हे संत तुकारामांचे शब्द वृक्षतोडीने नि:शब्द बनून पक्ष्यांची स्वरे दुर्मिळ होत आहेत. वृक्षांमुळे पर्यावरण शुद्ध गंधीत राहून पक्षी सुस्वरात आळवितात. वृक्षतोडीने किती थकलेल्या प्राण्यांचा विसावा हरपणार. हे अनभिज्ञ असलेल्या व पैशाच्या मोहात संतांच्या शिकवणीचा बाजार मांडलेल्या, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत वृक्षांची कत्तल ही बदलत्या पर्यावरणात धोक्याची घंटी आहे.पूर्वी गावाशेजारी घनदाट अरण्य व आमराई तथा मोठे बाभूळबन असायचे. क्वचित सागवन, बेहडा, हिरडा, आवळा यासारख्या वनस्पती औषधी गुणांसोबतच बहारदार सुगंधाने पर्यावरणाचा समतोल राखत असत. गावाशेजारी अरण्यात फिरणारे पशू पक्षी सुद्धा डोलात विहारत असत. रस्त्याने जातांना उन्हात तहान भूक लागली तरी आमराईची सावली विसावा देवून तहानभूक हरवून जायची. ‘शुष्क काष्ठ तिष्ठत्येग्रे’ या संस्कृत म्हणीप्रमाणे वाळलेले झाड सुद्धा सुशोभीत असते. पण हवा, माती, पाणी राहिले पण झाडांची कत्तल सुरू झाली. बिजे पणजोबांनी पुरीले, फळे चालखे नातवंडांनी, पुण्याई गुरुंची शिष्य सानीयानी फखले. घनदाट आमराईने श्रृंगारलेले गाव वृक्षतोडीने वाळवंटासारखे दिसत आहेत.गावात तथा रस्त्याच्या कडेला वृक्ष लावा वृक्ष जगवा म्हणून दरवर्षी शासन कोट्यवधी रुपये खर्चून जोगवा मागतो. योजना अंमलात आली की झाडे जगतच नाही. होते काय तर मंत्र्यांपासून गावच्या संत्र्यांपर्यंत ‘मामला फायनल’ केला जातो. वडिलोपार्जीत फळांचे, औषधीगुणांचे झाड तोडू नका ते तोडल्यास मोठ्या कार्यवाहीला समोर जावे लागेल असा कायदा आहे किंवा नाही व कायदा आहे तर कारवाई वनविभाग का करीत नाही. तलाठी शासकीय व रस्त्यालगतची झाडे तोडण्याचा सात बारा कसा देतो, असेअनेक प्रश्न भ्रष्ट नितीने अनुत्तरीत आहेत. झाडे लावा झाडे जगवा अशा प्रभात फेऱ्या शाळकरी मुलं सुद्धा गावातून काढतात. या अनभिन्न मुलांना सुद्धा बदलत्या पर्यावरणाचा धोका आहे. हे संदेश देणारी मुलंही रस्त्यावरील गावाशेजारील व शेताशिवारातील झाडं विकणाऱ्या किंवा कुऱ्हाडीने कत्तल करणाऱ्या कंत्राटदारांचीच असतील. पण पैशासाठी वाट्टेल ते करायला कुणीही मागे पुढे पाहत नाही.रस्त्यातून उन्हात जाणाऱ्या पादचाऱ्यांना तहान भुकेने व्याकुळ झाल्यानंतर झाडांच्या सावलीचा विसावा हवा असतो. वानरांना अन्नासोबत कड्या मारायला झाड हवे असते. पक्षांना किलबिलासाठी तथा पृथ्वीवरील संपूर्ण प्राण्यांना पर्यावरणासाठी झाड हवे असते ते झाडच तोडले तर पर्यावरणाचा समतोल राहील का? याचा विचार करूनच झाड तोडणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी)