निवडणूक जि.प. अध्यक्षपद-उपाध्यक्षपदाची३९ विरुद्ध १३ असे हात उंचावून पार पडले मतदान भंडारा : ५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. यात अध्यक्षपदी काँग्रेसच्या भाग्यश्री गिलोरकर यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश डोंगरे यांची उपाध्यक्षपदी ३९ विरुद्ध १३ मताने निवड झाली.भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस १९, राष्ट्रवादी काँग्रेस १५, भाजप १३, चार अपक्ष आणि शिवसेना एक असे पक्षीय बलाबल आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या अध्यक्ष पदाच्या जागेसाठी काँग्रेसकडून भाग्यश्री गिलोरकर, चित्रा सावरबांधे, प्रणाली ठाकरे, राकाँकडून रेखा ठाकरे तर भाजपकडून निलीमा ईलमे, मंजुषा गभणे असे सहा उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. सावरबांधे, ठाकरे, गभणे यांनी नामांकन परत घेतले. त्यानंतर गिलोरकर विरुद्ध ईलमे यांच्यात निवडणूक झाली. यात गिलोरकर यांना ३९ तर ईलमे यांना १३ मते मिळाली.उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश डोंगरे, नरेश डहारे तर भाजपकडून अरविंद भालाधरे यांनी नामांकन दाखल केले. डहारे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर डोंगरे विरुद्ध भालाधरे अशी थेट लढत झाली. यात डोंगरे यांना ३९ तर भालाधरे यांना १३ मते मिळाली. या ३९ मतांमध्ये काँग्रेसचे १९, राकाँचे १५, चार अपक्ष व शिवसेनेच्या एका मताचा समावेश आहे.सकाळी ११ ते १ पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, ३.१५ ते ३.३० पर्यंत नामनिर्देशन पत्राची छानणी, ३.३० ते ३.४५ उमेदवारी मागे घेणे व चार वाजता मतदान असा कार्यक्रम होता. ही प्रक्रिया जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांनी पार पाडली. या सभेला नवनियुक्त ५२ जिल्हा परिषद सदस्य, सात पंचायत समितींचे सभापती उपस्थित होते.संयुक्त पत्रपरिषदेत कॉग्रेस-राकाँने दिला विकासाचा नाराअध्यक्ष - उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर काँग्रेस - राष्ट्रवादीने संयुक्त पत्रपरिषद घेतली. जिल्हा परिषदेतील नवनियुक्त पदाधिकारी हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणार असून जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे राहतील. भाजपने केलेला शेतकऱ्यांचा भ्रमनिरास आघाडीच्या काळात होणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार सेवक वाघाये, भंडारा जिल्हा निरिक्षक तानाजी वनवे, जिल्हाध्यक्ष जीया पटेल, सीमा भुरे यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, अविनाश ब्राम्हणकर यांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)ग्रामीण समस्या सोडवू -गिलोरकरयावेळी नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणार आहे. आपण ग्रामीण भागातून असल्यामुळे आपल्याला ग्रामीण जनतेच्या प्रश्नांची जाणीव आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो की आरोग्यापासून ग्रामीण शिक्षणावर भर देणार आहे. नागरिकांना कुठल्याही कामासाठी अडचणी येऊ नये, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.पारदर्शी कामकाजावर भर - डोंगरेनवनियुक्त उपाध्यक्ष राजेश डोंगरे म्हणाले, यापुढे ग्रामीण जनतेची कामे यथाशीघ्र सोडविण्यात येतील. एकाच कामासाठी त्यांना वारंवार यावे लागणार नाही. यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना ज्या भुलथापा दिल्या तसे होणार नाही. मागील कार्यकाळातही आपण सदस्य होतो. त्यावेळेची ताडपत्री खरेदीसह अनाठायी झालेल्या खर्चाची चौकशी करुन गैरव्यवहार बाहेर काढण्यात येईल, असे स्पष्ट केले.
गिलोरकर अध्यक्ष, डोंगरे उपाध्यक्ष
By admin | Updated: July 16, 2015 00:49 IST