शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

‘आॅनलाईन शॉपिंग’मध्ये फसवणुकीचा धोका

By admin | Updated: October 24, 2016 00:44 IST

इंटरनेटमुळे व्यवहारांमध्ये सुलभता आली आहे; पण अनेक धोकेही येत आहेत.

विश्वासाहर्तावर प्रश्नचिन्ह : शहरासह ग्रामीण भागातही पडली भुरळभंडारा : इंटरनेटमुळे व्यवहारांमध्ये सुलभता आली आहे; पण अनेक धोकेही येत आहेत. चोरटेही आता या क्षेत्रात कार्यरत झाल्याची माहिती पूढे येत आहे. केवळ ज्ञान मिळवून शिक्षण घेऊन घरबसल्या दारोडा टाकता येत असल्याने चोरीची पद्धतही बदलल्याचे दिसते. शारीरिक कष्ट घेण्यापेक्षा चोरट्यांना आता केवळ ‘वेबसाईट हॅक’ करण्याचे ज्ञान मिळविणे इतकीच तसदी घ्यावी लागत असल्याने या क्षेत्रात चोरट्यांची संख्या वाढल्याची शक्यता नाकारता येत नाही. यातूनच ‘आॅनलाईन’ खरेदीत फसवणुकीच्या अनेक घटना उजेडात येत आहेत.आॅनलाईन खरेदीच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे काही बाबींची खबरदारी घेणे गरजेचे असते. आॅनलाईन म्हणजे ‘इंटरनेट शॉपिंग’ करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो. घरबसल्या खरेदी होत असल्याने बाजारातील गर्दी, वेळ आणि इंधनाची बचत होते; पण आॅनलाईन शॉपिंगबद्दल नागरिकांत शंका-कुशंका वाढत आहेत. अनेकांची यामुळे झालेली फसवणूक आणि आॅनलाईनची विश्वासाहर्ता यामुळे ग्राहकही अडचणीत येत असल्याचे दिसते. स्वस्तातील स्मार्टफोन व इंटरनेटमुळे सध्या ग्रामीण भागातील व्यक्तीही ‘ब्राऊजिंग’ करून एकाच प्रकारातील शेकडो ‘प्रॉडक्टस’ आॅनलाईन पाहू शकतात. यामुळे पारंपरिक दुकान, स्टोअर्ससह मॉलमध्ये प्रत्यक्षात जाऊन होणारा वेळेचा अपव्यय टाळता येतो. ‘आॅनलाईन रिटेलिंग’मुळे खरेदीचा विस्तार झाला आहे. आॅनलाईन रिटेलिंगने खरेदीचे दालन सर्वांसाठीखुले केले आहे. यामुळे जे लोक रिटेलिंगपासून दूर होते, ते आता जवळ आले आहेत. आॅनलाईन रिटेलर्स ग्राहकांना काही वाजवी दरात विविध वस्तूंची विक्री करतात. जे ‘प्रॉडक्ट’ गावात मिळत नाही, त्याचीही खरेदी करणे यामुळे शक्य झाले आहे. वेबसाईटमुळे आपण कधीही आॅनलाईन खरेदी करू शकतो. यामुळे जे लोक जायबंदी आहे, अशा लोकांनाही बसल्या जागेवर वस्तूंची खरेदी करता येते. खरेदी करण्यापूर्वी आपण इंटरनेटवर विविध प्रॉडक्टबाबत संशोधन तसेच त्यांच्या किंमतीतील तुलना करू शकतो. जे विविध दुकान, स्टोअर्सला प्रत्यक्ष भेट देऊनही करता येत नाही. आॅनलाईन खरेदीचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. आॅनलाईन रिटेलर्स पारंपरिक दुकानाच्या तुलनेत वाजवी दरात प्रॉडक्टसची दुकानांच्या तुलनेत विक्री करीत असले तरी त्या प्रॉडक्टसच्या दर्जाबाबत कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. पारंपरिक दुकानांमध्ये जावून तुम्ही वस्तूची तत्काळ खरेदी केली तर ती वस्तू घरी यायला काही दिवस लागतात. आॅनलाईन खरेदी करताना फसवणुकीची शक्यता अधिक असते. यात प्रॉडक्टसाठी विक्री करणाऱ्या तिसऱ्या पक्षाकडून खरेदीदारांची फसवणूक होण्याची शक्यता असते. शिवाय संकेतस्थळांची विश्वासाहर्ता महत्त्वाची असते. (शहर प्रतिनिधी)आॅनलाईन वस्तू परत करणे जिकरीचेआॅनलाईन वस्तू परत करणे अत्यंत अवघड असते. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वाहतुकीचा खर्च द्यावा लागतो. दुकानामध्ये वस्तू खरेदी करताना आपण वस्तू प्रत्यक्ष हातात घेऊन दर्जाबाबत खात्री करून घेतो. याउलट आॅनलाईन वस्तू आकर्षक व चमकदार वाटत असली तरी प्रत्यक्षात ती तशी असेलच, असे नाही. आॅनलाईन खरेदीमध्ये वाहतुकीच्या खर्चाबाबत प्रारंभी काहीच सांगितले जात नाही. नंतर मात्र हा शिपिंगचा म्हणजेच वाहतुकीचा अतिरिक्त खर्च या वस्तुच्या मूळ किंमतीमध्ये जोडला जातो. यात किंमत वाढून फसगत होते.