दरम्यान, तालुक्यातील विविध गरीब कुटुंबांतील काही सदस्यांनी शासनाच्या विविध योजनाच्या लाभासाठी संयुक्त रेशनकार्डाचे विभाजन केले असल्याची चर्चा आहे. तथापि, शासनाच्या विविध योजनांचा लाभ होत असताना स्वतंत्र रेशनकार्ड असताना शासनाच्या दुर्लक्षाने अनेक कुटुंब अन्न धान्याच्या लाभापासून वंचित असल्याची ओरड आहे. याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन एपीएल रेशनकार्डधारक कुटुंबांना नियमित धान्य पुरवठा होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी वंचित कार्डधारक कुटुंबांनी केली आहे.
बॉक्स
दीड वर्षांपासून धान्य नाही
शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेनुसार सार्वजनिक धान्य वितरणप्रणाली अंतर्गत दरमहा रेशनकार्डधारक गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. या कार्डधारक कुटुंबांत बीपीएल, अंत्योदय, प्राधान्य गट व एपीएल कार्डधारक कुटुंबांचा समावेश आहे. दरम्यान, शासनाच्या अन्न पुरवठा विभागांतर्गत तालुक्यातील बीपीएल, अंत्योदय व प्राधान्य गटातील कार्डधारक कुटुंबांना नियमित धान्याचा पुरवठा होत असताना एपीएल कार्डधारक कुटुंबांना तब्बल दीड वर्षांपासून धान्य पुरवठा होत नसल्याची ओरड आहे.